एटीएसची कारवाई; पालघर येथून विनापासपोर्ट राहणाऱ्या पाच बांग्लादेशींना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 07:13 PM2019-01-19T19:13:04+5:302019-01-19T19:14:20+5:30

हे पाचही जण पासपोर्टशिवाय बेकायदेशीररित्या भारतात राहत असल्याकारणाने ही कारवाई करण्यात आली. 

ATS take action; Five Bangladeshi nationals arrested from Palghar are arrested | एटीएसची कारवाई; पालघर येथून विनापासपोर्ट राहणाऱ्या पाच बांग्लादेशींना अटक 

एटीएसची कारवाई; पालघर येथून विनापासपोर्ट राहणाऱ्या पाच बांग्लादेशींना अटक 

googlenewsNext
ठळक मुद्देनालासोपारा पूर्वेकडील आचोळे तलावासमोरून पासपोर्टशिवाय राहणाऱ्या पाच बांग्लादेशींना दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे . या पाचही जणांना भारतीय पासपोर्ट अधिनियम १९२० च्या कलम ३ (अ). ६ (अ) सह विदेशी अधिनियम १९४६ चे कलम १४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.   

पालघर - आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालासोपारा पूर्वेकडील आचोळे तलावासमोरून पासपोर्टशिवाय राहणाऱ्या पाच बांग्लादेशींना दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे . हे पाचही जण पासपोर्टशिवाय बेकायदेशीररित्या भारतात राहत असल्याकारणाने ही कारवाई करण्यात आली. 

शमसूर मन्सूर शेख (७०), मोशीया सोमेद मुल्ला (६५), मोहम्मद कोटील खलिफा (६४), मोहम्मद जहांगीर आलं  (४७), मोफीस बुऱ्हान शेख (१९) अशी या अटक केलेल्या बांग्लादेशींची नावे आहेत. या पाचही जणांना भारतीय पासपोर्ट अधिनियम १९२० च्या कलम ३ (अ). ६ (अ) सह विदेशी अधिनियम १९४६ चे कलम १४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.   

Web Title: ATS take action; Five Bangladeshi nationals arrested from Palghar are arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.