गळा आवळून महिलेची हत्या; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सापडला मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 06:54 PM2019-01-07T18:54:19+5:302019-01-07T18:56:00+5:30

कासा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. याप्रकरणी कासा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. 

Assassination of woman by assault; The bodies found on the Mumbai-Ahmedabad highway | गळा आवळून महिलेची हत्या; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सापडला मृतदेह 

गळा आवळून महिलेची हत्या; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सापडला मृतदेह 

ठळक मुद्देकासा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पोलीस कसून याप्रकरणी चौकशी करत आहे.  

पालघर - मुंबई - अहमदाबाद महामार्गावर गुजरात वाहिनीच्या दिशेने तवा गावाच्या हद्दीत एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. कासा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. याप्रकरणी कासा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. 

कासा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 302,201 प्रमाणे गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपीचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंदाजे 25 ते 30 वयोगटातील अनोळखी महिलेला कोणीतरी अज्ञात आरोपीने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून जीवे ठार मारून मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरात वाहिनीच्या बाजूला तवा गावचे हद्दीत फेकून दिले होते. पोलीस कसून याप्रकरणी चौकशी करत आहे.  

Web Title: Assassination of woman by assault; The bodies found on the Mumbai-Ahmedabad highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.