The arrest of a youth who molested the girl by video call and arrested | व्हिडीओ कॉल करून तरुणीचा विनयभंग; तरुणाला अटक 
व्हिडीओ कॉल करून तरुणीचा विनयभंग; तरुणाला अटक 

ठळक मुद्देमुलीला व्हिडिओ कॉल करुन तिच्याशी अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आरोपीने गुन्ह्यात शरीरविक्री करणाऱ्या महिलेचा मोबाईल फोन वापरलातो अश्लील कृती करत होता. मी लगेच तो फोन ठेवला.

मुंबई - मलबार हिल येथे राहणाऱ्या एका फॅशन डिझायनरच्या मुलीला व्हिडिओ कॉल करुन तिच्याशी अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाला मलबार हिल पोलिसांनीअटक केली आहे. आरोपीचे वडिल पीडित मुलीच्या आईने डिझाईन केलेले ड्रेस शिवण्याचे काम करीत असूनयाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीने गुन्ह्यात शरीरविक्री करणाऱ्या महिलेचा मोबाईल फोन वापरला. फय्याज अहमद असे आरोपीचे नाव असून तक्रार दाखल झाल्यानंतर दहा तासांच्या आत आरोपीला पोलिसांनी अटक केली. मध्यरात्रीच्या सुमारास आपल्याला व्हिडिओ कॉल आला. मी कॉल उचलल्यानंतर पलीकडच्या व्यक्तीचा चेहरा दिसत नव्हता. मात्र तो अश्लील कृती करत होता. मी लगेच तो फोन ठेवला. पण त्याच नंबरवरुन काही मिनिटांनी दुसरा व्हिडिओ कॉल आला. आपल्या आईने सुद्धा हा व्हिडीओ कॉल पाहिला असे तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर संबंधित फॅशन डिझायनरने मुलीला सोबत घेऊन मलबार हिल पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. 


Web Title: The arrest of a youth who molested the girl by video call and arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.