सुंदर बायकोसाठी केली अघोरी पूजा; दोघांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 04:16 AM2018-09-27T04:16:36+5:302018-09-27T06:24:11+5:30

नप्राप्तीसह सुंदर बायको मिळावी व इतर लाभ करून देण्याच्या बहाण्याने अघोरी पूजेत नर बळीची मागणी करणाऱ्या तांत्रिक बाबासह त्याला पूजेसाठी आणणा-यास पोलिसांनी अटक केली आहे.

Aghori Pooja for beautiful wife, Two arrested | सुंदर बायकोसाठी केली अघोरी पूजा; दोघांना बेड्या

सुंदर बायकोसाठी केली अघोरी पूजा; दोघांना बेड्या

Next

नंदुरबार : धनप्राप्तीसह सुंदर बायको मिळावी व इतर लाभ करून देण्याच्या बहाण्याने अघोरी पूजेत नर बळीची मागणी करणाऱ्या तांत्रिक बाबासह त्याला पूजेसाठी आणणाºयास पोलिसांनी अटक केली आहे. शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
येथील बाबा गणपतीच्या मागे राहणारे अमोल सोनार यांच्या घरात हा प्रकार तीन दिवसांपूर्वी घडला. पोलिसांनी अमोल सोनारसह तांत्रिक बाबा सुरुपसिंग महाराज यास अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी दिली.
परेश सोनारच्या फिर्यादीनुसार अमोल सोनार व आणखी दोघांनी त्याला पूजेच्या ठिकाणी नेले. तेथे तांत्रिक बाबाने विवस्त्र अवस्थेत पूजा केली. मंतरलेले
पाणी पिण्यास दिले. त्यानंतर धनप्राप्ती व इतर लाभासाठी यापुढच्या पूजेत नरबळी द्यावा लागेल, असे सांगितले. परेश सोनार घाबरलेल्या अवस्थेत तेथून निघाले. त्यांनी घरी हा प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी महाराष्टÑ नरबळी आणि इतर अमानुष व अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Aghori Pooja for beautiful wife, Two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.