डॉ. संतोष पोळ प्रकरण; कारागृह सुरक्षारक्षक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 03:30 PM2018-11-30T15:30:24+5:302018-11-30T15:30:57+5:30

पोळ आणि अमोल पवार यांना छुप्या मार्गाने मदत केल्याचा ठपका सुरक्षारक्षकावर ठेवला आहे. तो दीड वर्षापूर्वी सोलापूरहून कळंबा कारागृहात रुजू झाला होता.

Accused Dr. Santosh Paul Case; Suspended prison guard | डॉ. संतोष पोळ प्रकरण; कारागृह सुरक्षारक्षक निलंबित

डॉ. संतोष पोळ प्रकरण; कारागृह सुरक्षारक्षक निलंबित

googlenewsNext
ठळक मुद्दे कळंबा कारागृहातील पिस्तुल घेऊन वावरत असल्याचा व्हिडिओ वायरल झाल्याने एकच खळबळ उडालीडॉ. पोळ याच्यावर ६ खून केल्याचे आरोप आहेत११ ऑगस्ट २०१६ मध्ये त्याला वाई पोलिसांनी अटक केली.

कोल्हापूर - वाई येथील सिरियल किलर डॉ. संतोष पोळ याचा कळंबा कारागृहातील पिस्तुल घेऊन वावरत असल्याचा व्हिडिओ वायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोळ याच्यावर ३६ खून केल्याचे गुन्हे दाखल आहेत. कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल पुरवल्याप्रकरणी पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी सुरक्षारक्षकास तडकाफडकी आज निलंबित केले. राकेश शिवाजी पवार (वय ३०, रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) असे त्या सुरक्षारक्षकाचं नाव आहे. पोळ आणि अमोल पवार यांना छुप्या मार्गाने मदत केल्याचा ठपका सुरक्षारक्षकावर ठेवला आहे. तो दीड वर्षापूर्वी सोलापूरहून कळंबा कारागृहात रुजू झाला होता. त्याचे वर्तन सुरुवातीपासून संशयास्पद होते. याप्रकरणात आणखी काही संशयित सुरक्षारकांचा समावेश असून त्यांचेवर लकवरच कारवाई होणार असल्याची माहिती उपमहानिरीक्षक साठे यांनी दिली.

डॉ. पोळ याच्यावर ६ खून केल्याचे आरोप आहेत. मंगल जेधे या महिलेचा खून केल्यानंतर पोळचे हत्या प्रकरण उघडकीस आले. ११ ऑगस्ट २०१६ मध्ये त्याला वाई पोलिसांनी अटक केली. यानंतर सलमा शेख, नथमल भंडारे, जगाबाई पोळ, सुरखा चिकने आणि वनिता गायकवाड यांची हत्या करून मृतदेह फार्महाऊसमागे पुरले असल्याचे निष्पन्न झाले. २००३ ते २०१६ पर्यंत या महिला बेपत्ता होत्या. जिल्हा सत्र न्यायालय, सातारा येथे खटल्याचे कामकाज सुरू आहे. कोल्हापुरातील कळंबा कारागृहात त्याला ३० सप्टेंबर २०१६ मध्ये दाखल केले. सहआरोपी ज्योती पांडुरंग मांडरे ही माफीची साक्षीदार बनली आहे. ती सध्या सातारा जेलमध्ये आहे. ज्योती मांडरे हिने पिस्तुल जेलमधील कर्मचारी सुभेदार राजाराम कोळी याच्याकडे दिले. कोळी याने वरिष्ठ कारागृह अधिकारी चंद्रकांत आवळे याच्याकडे दिले. आवळे याने आर्थिक व्यवहार करून पिस्तूल पुरवले, अशी माहिती पोळ याने व्हिडिओतून दिली आहे. या प्रकरणाची चौकशी जेल अधीक्षक शरद शेळके यांच्याकडून सुरू आहे. 

 

Web Title: Accused Dr. Santosh Paul Case; Suspended prison guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.