नारायणगाव येथे जुन्या भांडणातून ५५ वर्षीय व्यक्तीला पेटविले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 07:29 PM2019-05-15T19:29:11+5:302019-05-15T19:37:42+5:30

जुन्या भांडणाचा राग मनात धरून  ५५ वर्षीय व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकुन पेटवून दिले..

A 55-year-old man was burnt by the old quarrel at Narayangaon | नारायणगाव येथे जुन्या भांडणातून ५५ वर्षीय व्यक्तीला पेटविले

नारायणगाव येथे जुन्या भांडणातून ५५ वर्षीय व्यक्तीला पेटविले

नारायणगाव : जुन्या भांडणाचा राग मनात धरून  ५५ वर्षीय व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकुन पेटवून दिले व त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना नारायणगावपोलिसांनीअटक केली आहे. ही घटना प्रकार मांजरवाडी येथे बुधवारी (दि १५) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली. 
   ऋषीकेश पोपट लोखंडे (वय २०) व किरण कानिफनाथ जाधव (वय २१) दोघेही रा. मांजरवाडी ता. जुन्नर जि. यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. रशिद तांबोळी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला प्रकरणी शोएब रशिद तांबोळी ( वय २४  रा. मांजरवाडी ता. जुन्नर) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
     याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार , दोन महिन्यांपूर्वी सिमेंट काँक्रीट चे काम सुरु असताना ऋषीकेश लोखंडे हा त्या रस्त्यावरून दुचाकी ने जात असताना त्यांना रशिदभाई तांबोळी यांनी मज्जाव केला. त्यावेळी दोघांमध्ये भांडणे झाले होते . या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आज ( दि १५) मध्यरात्री १ वा सुमारास फोन करून तुमचा मुलगा शोएब कोठे आहे, अशी चौकशी करून माचीस व सिगारेट विकत घेतल्यानंतर रशिद तांबोळी यांच्या अंगावर पेट्रोल टाकुन त्यांनी पेटवून जीवे मारण्यांचा प्रयत्न केला. तांबोळी हे ६५ टक्के भाजले असून त्यांचेवर मंचर येथील जिल्हा उप रुग्णालयात उपचार सुरु आहेत . ऋषीकेश लोखंडे  व किरण जाधव या दोघांना पोलिसांनी बुधवारी (दि १५ ) अटक केली आहे . यापुढील तपास  सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील करीत आहेत .

Web Title: A 55-year-old man was burnt by the old quarrel at Narayangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.