20-year-old youth committed suicide after jumping from kasheli creek bridge | कशेळी खाडीच्या पुलावरून उडी मारून २० वर्षीय तरुणाची आत्महत्या 
कशेळी खाडीच्या पुलावरून उडी मारून २० वर्षीय तरुणाची आत्महत्या 

ठळक मुद्देअरमान हा सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणो मोटारसायकल घेऊन भिवंडीत कॉल सेंटर येथे कामाला घरातून निघाला होता. वाहत्या पाण्यात अरमान हा वाहून गेला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. अरमान याच्या नातेवाईकांनीही घटनास्थळी घेतली.

ठाणे - ठाणे पश्चिमेकडील कशेळी खाडीच्या पुलावरून मोटारसायकल उभी करून लोकमान्य नगर पाडा नंबर २ येथील रहिवासी असलेल्या अरमान इरफान अलवी (20) या तरूणाने सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास उडी घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ त्याचा शोध घेतला. मात्र, शोध घेऊनही तो अद्यापही मिळून आलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अरमान हा सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणो मोटारसायकल घेऊन भिवंडीत कॉल सेंटर येथे कामाला घरातून निघाला होता. दुपारी 3 ते 3.15 वाजण्याच्या सुमारास कशेळी खाडीत कोणीतरी तरूण पडल्याची माहिती कापुरबावडी पोलिसांनी ठाणे महानगरपालिका  आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानुसार,घटनास्थळी आपत्ती कक्ष आणि बाळकुम अग्रिशमक दलाच्या जवानांनी धाव घेत अरमानने कॉलम नंबर 1/540 येथून खाडीत उडी घेतली होती. त्या ठिकाणापासून काही अंतरार्पयत त्याचा शोध घेतला.परंतु, तो मिळून आला नाही. मात्र, ज्यावेळी उडी घेतली. त्यावेळी खाडीत ओहटी होण्यास सुरूवात झाली होती. तसेच खाडीचे पात्र मोठे असल्याने आणि त्यातच वाहत्या पाण्यात अरमान हा वाहून गेला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. अरमान याच्या नातेवाईकांनीही घटनास्थळी घेतली. घरची परिस्थिती चांगली असताना त्याने असे का केले असा प्रश्न त्याच्या नातेवाईकांना पडला आहे. 


Web Title: 20-year-old youth committed suicide after jumping from kasheli creek bridge
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.