वडिलांच्या मित्राकडून 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 04:40 PM2018-12-05T16:40:38+5:302018-12-05T16:41:15+5:30

वडिलांच्याच मित्राकडून सासष्टीतील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार होण्याची घटना घडली असून या प्रकरणातील संशयित सध्या नोकरीनिमित्त विदेशात गेल्याने गोवा पोलीस त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्याच्या तयारीत आहेत.

A 14-year-old girl raped by fathers friend | वडिलांच्या मित्राकडून 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

वडिलांच्या मित्राकडून 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

googlenewsNext

मडगाव: वडिलांच्याच मित्राकडून सासष्टीतील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार होण्याची घटना घडली असून या प्रकरणातील संशयित सध्या नोकरीनिमित्त विदेशात गेल्याने गोवा पोलीस त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्याच्या तयारीत आहेत.
सदर घटना धर्मापूर-शिर्ली या गावात घडली असून मडगाव पोलिसांनी आरोपी इग्नेशियस कुतिन्हो (वय 50) याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान सदर संशयिताने त्या मुलीवर अनेकदा बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, संशयित कुतिन्हो हा पिडीत मुलीच्या घराशेजारीच राहत होता आणि त्या मुलीच्या वडिलांसोबत त्याची मैत्री होती. याच मैत्रीमुळे तो कित्येकदा त्या मुलीच्या घरी येत होता. मुलीचे वडील घरी नसल्याचा फायदा उठवित त्याने हे कृत्य केले. दरम्यान, या प्रकरणाची माहिती तिच्या वडिलांना मिळूनही आपल्या मुलीचे नाव खराब होईल या भीतीने या प्रकरणाचा त्यांनी गवगवा केला नाही.

मात्र, सदर मुलगी शाळेत गेली असता तिला त्रास व्हायला सुरु झाल्यानंतर शिक्षिकेने तिला खोदून विचारले असता, आपल्यावर आलेल्या अतिप्रसंगाची माहिती तिने त्या शिक्षिकेला दिली. त्या शिक्षिकेने चाईल्ड लाईन या मुलासंदर्भात काम करणा-या एनजीओला या घटनेची माहिती दिल्यानंतर या एनजीओने मंगळवारी मडगाव पोलिसात तक्रार दिली. सदर प्रकार या मुलीच्या मोठय़ा बहिणीलाही माहित होता. मात्र या घटनेची वाच्यता केल्यास संशयिताने त्या दोघींना जीवंत मारण्याची धमकी दिल्याने सुरुवातीला तिच्या बहिणीनेही कुणाला या संबंधात माहिती दिली नाही.

यासंदर्भात दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांना विचारले असता, 15 दिवसांपूर्वीच संशयित नोकरीनिमित्त विदेशात गेलेला असून या प्रकरणात त्याला अटक करण्यासाठी मडगाव पोलीस लवकरच लुक आऊट नोटीस जारी करतील असे त्यांनी सांगितले.

Web Title: A 14-year-old girl raped by fathers friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.