आपल्या मुलांशीच लग्न करणाऱ्या आईला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 02:52 PM2017-11-16T14:52:52+5:302017-11-16T15:01:30+5:30

या आईने आधी आपल्या मुलाशी नंतर मुलीशी लग्न केल्याने तिच्यावर कारवाई करण्यात आलीये.

10-year jail sentence for the mother married to her children | आपल्या मुलांशीच लग्न करणाऱ्या आईला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

आपल्या मुलांशीच लग्न करणाऱ्या आईला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Next
ठळक मुद्देया महिलेची दोन्ही मुलं आधी तिच्यापासून दूर राहायची.तिने आपल्या दोन्ही मुलांसोबत गुपचुप लग्न केलं होतं.मुलासोबतचा संसार मोडल्यानंतर तिने मुलीशी लग्न केलं

ओक्लाहोमा - अमेरिकेतल्या ओक्लाहोमा या शहरात राहणाऱ्या एका बाईने आपल्याच मुलांसोबत लग्न केल्याचा एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. बरीच वर्ष आपल्यापासून लांब राहणाऱ्या मुलांना भेटल्यानंतर आईने चक्क त्यांच्याशी लग्न केलं. हा प्रकार तिकडच्या ह्युमन सर्व्हिस चाईल्ड वेल्फेअर इन्व्हेस्टिगेशनच्या विभागाला समजला तेव्हा या आईवर कारवाई करण्यात आली असून तिला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

पॅट्रीसिया स्पॅन या ४४ वर्षीय महिलेने २०१४ साली २६ वर्षीय तिची मुलगी सिस्टी स्पॅन हिच्याशी लग्न केलं होतं. ह्युमन सर्व्हिस चाईल्ड वेल्फेअर इन्व्हेस्टिगेशनच्या विभागाला या लग्नाबद्दल माहित झालं. हे लग्न करण्याआधी पॅट्रीसियाने एका वकिलाशीही चर्चा केली होती. त्यामुळे पॅट्रीसिया आणि सिस्टी या दोघींचं लग्न कोणत्याही नियमाच्या विरोधात नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र अमेरिकेत जवळच्या संबंधांशी लग्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. त्यांना जवळपास १० वर्षांची शिक्षा सुनावली जाते. म्हणूनच हा सगळा प्रकार उजेडात आल्यावर त्या निर्दयी आईवर कारवाई करण्यात आली. तिच्या मुलीनेच याबाबत तक्रार दाखल केली होती. हा सगळा प्रकार नियमाच्या विरोधात असल्याचं तिच्या लक्षात आल्यावर तिने याबाबत तक्रार दाखल केली. मात्र कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलं नसल्याचाच दावा पॅट्रिसिया हिच्याकडून केला जातोय.

हा प्रकरण इथेच संपत नाही. ह्युमन सर्व्हिस चाईल्ड वेल्फेअर इन्व्हेस्टिगेशनच्या विभागाने केलेल्या तपासात असंही बाहेर आलंय की  २००८ साली पॅट्रिसियाने तिच्या मुलाशीही लग्न केलं होतं. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आई पॅट्रिसिया आणि मुलगा मिस्टी स्पॅन यांच्यात मैत्री होती, त्यातूनच त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले होते. लग्नाच्या १५ महिन्यानंतर या मुलाने पोलियात तक्रार दाखल केली. मात्र मुलाच्या जन्मपत्रिकेवर आईचं नाव नसल्याने तेव्हा हे प्रकरण मिटवण्यात आलं होतं. मात्र आता पुन्हा सिस्टीने तक्रार दाखल केल्यानंतर आईवर कडक कारवाई करण्यात आली असून तिला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

सौजन्य - www.scoopwhoop.com

Web Title: 10-year jail sentence for the mother married to her children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.