चिमुकल्यांचे जोरदार सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:14 AM2018-04-03T01:14:12+5:302018-04-03T16:05:19+5:30

इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व, उत्तम संवाद कौशल्य आणि कलागुणांच्या सादरीकरणादरम्यान चिमुकल्यांनी नाट्य, संवादाचे उत्कृष्ट सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त होते यलो डोअरमध्ये आयोजित हेलेन ओ ग्रेडीच्या उपक्रमाचे.

Vigorous representation of children | चिमुकल्यांचे जोरदार सादरीकरण

चिमुकल्यांचे जोरदार सादरीकरण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्व, उत्तम संवाद कौशल्य आणि कलागुणांच्या सादरीकरणादरम्यान चिमुकल्यांनी नाट्य, संवादाचे उत्कृष्ट सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त होते यलो डोअरमध्ये आयोजित हेलेन ओ ग्रेडीच्या उपक्रमाचे.
यलो डोअरच्या माध्यमातून शनिवारी सायंकाळी लोकमत हॉल येथे चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यानी नाटकांचे सादरीकरण केले. याशिवाय विविध खेळांच्या आणि उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, कलागुणांना वाव आणि विचारक्षमतांना प्रोत्साहन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कलाकृतींना उपस्थित रसिकांनी भरभरुन दाद दिली. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘लोकमत’चे कार्यकारी संचालक करण दर्डा आणि आर. जे. इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष मनमितसिंग राजपाल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.
द यलो डोअरच्या माध्यमातून साडेतीन ते २८ वर्षांपर्यंतच्या मुले आणि युवकांसाठी ‘स्टोरी बुक अ‍ॅडव्हेन्चर अ‍ॅण्ड सिटीज’ हा आॅस्ट्रेलिया येथील ‘हेलेन ओ ग्रेडी’ हा उपक्रम पाच वर्षांपासून राबविला जात आहे.
या उक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना, सहकार्यातून अध्ययन, व्यक्तिमत्त्व विकास करण्यात येत आहे. तसेच नृत्य, नाट्य, कथा, अभिनय या कलागुणांना संधी उपलब्ध करून दिली जाते.

Web Title: Vigorous representation of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.