‘एक जोडी चप्पल समाधानाची’; नव्या चपलांची भेट मिळताच अनवाणी फिरणारे चिमुकले सुखावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 01:17 PM2023-05-05T13:17:02+5:302023-05-05T13:18:16+5:30

अचानक मिळालेल्या या भेटीने अनेक मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरत असल्याचे पाहायला मिळते.

The little ones walking barefoot were happy when they got the gift of new slippers | ‘एक जोडी चप्पल समाधानाची’; नव्या चपलांची भेट मिळताच अनवाणी फिरणारे चिमुकले सुखावले

‘एक जोडी चप्पल समाधानाची’; नव्या चपलांची भेट मिळताच अनवाणी फिरणारे चिमुकले सुखावले

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : गरीब कुटुंबातील अनेक मुलांना चप्पल नसल्याने अनवाणी चालण्याची वेळ येते. अशा मुलांना नवी-कोरी चप्पल भेट देण्यासाठी आस्था जनविकास संस्थेने ‘एक जोडी चप्पल समाधानाची’ हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत शहराच्या विविध भागांसह बस स्थानक, रेल्वे स्टेशन येथे अनवाणी प्रवासाला निघालेल्या चिमुकल्यांना चपलेचा जोड भेट दिला जात आहे. अचानक मिळालेल्या या भेटीने अनेक मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरत असल्याचे पाहायला मिळते.

चपलेअभावी चिमुकल्यांना होणारा त्रास ‘आस्था’च्या अध्यक्षा डॉ. आरतीश्यामल जोशी यांच्या लक्षात आला. त्यांनी समाज माध्यमावर ही बाब टाकून दानशूरांना किमान एक जोड चपलेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

उपक्रमासाठी यांचे सहकार्य
उपक्रमासाठी सरिता लोणीकर, आरती पाटणकर, अक्षय कोडीलकर, आनंद अय्यंगार, यामिनी आसर, रितू नरवडे, अंजू मुळे, ज्योती करमासे, कविता पेरे पाटील, मंजुषा माळवतकर, अर्चना पिसू, रूपाली कुलकर्णी, अभिजित बागुल, डॉ. रेणू चव्हाण, वैशाली सदगुले, अश्विनी जहागीरदार, अदिती आठवले, लीना जोशी, मीना खंडागळे, विद्या पाटील, शशांक तांबोळी, अनुराधा कामत, विजय रणदिवे, संजय बरीदे, सुषमा गोटुरकर, प्राजक्ता भोसले वाघ, वैशाली नांदगावकर, अविनाश खांबेकर, प्रा. विद्या पाटील, मंजिरी व सलोनी संपट, अर्चना जोशी, संजोग बडवे, रजनी पाटील, ज्योत्स्ना पुजारी, तनया पाटील, अजिंक्य जवळीकर यांनी सहकार्य केले.

Web Title: The little ones walking barefoot were happy when they got the gift of new slippers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.