वार्षिक धान्य खरेदीसाठी थोड थांबा; ढगाळ वातावरण ठरेल घातक, आकाश कोरडे झाल्यावर घ्या

By प्रशांत तेलवाडकर | Published: March 25, 2023 03:21 PM2023-03-25T15:21:14+5:302023-03-25T15:21:33+5:30

संपूर्ण आकाश कोरडे झाल्यावर व कडक ऊन पडल्यावरच वार्षिक धान्य खरेदी करावी, असा सल्ला धान्याच्या व्यापाऱ्यांनी दिला आहे.

Stop short for the annual grain purchase; Cloudy weather will be dangerous, take it when the sky is dry | वार्षिक धान्य खरेदीसाठी थोड थांबा; ढगाळ वातावरण ठरेल घातक, आकाश कोरडे झाल्यावर घ्या

वार्षिक धान्य खरेदीसाठी थोड थांबा; ढगाळ वातावरण ठरेल घातक, आकाश कोरडे झाल्यावर घ्या

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : पुन्हा एकदा राज्यातील काही भागांत पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे ज्या दिवशी ढगाळ वातावरण असेल त्या दिवशी धान्य खरेदी टाळावी. शक्यतो, संपूर्ण आकाश कोरडे झाल्यावर व कडक ऊन पडल्यावरच वार्षिक धान्य खरेदी करावी, असा सल्ला धान्याच्या व्यापाऱ्यांनी दिला आहे. एप्रिल-मे हा वार्षिक धान्य खरेदीसाठी सर्वाेत्तम काळ मानला जातो. कारण, या काळात धान्याची मोठी आवक होऊन भावही थोडे कमी होतात. तसे दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून शहरवासीयांनी वार्षिक धान्य खरेदी सुरू केली आहे.

मध्यंतरी पडलेल्या अवकाळी पावसाने गव्हाचा रंग फिकट पडला आहे. यामुळे गव्हाला भाव चढला आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत महाग असले, तरी यावर्षी तांदूळ व डाळींचे भाव स्थिर आहेत. हाच वार्षिक धान्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासा आहे.

कडक उन्हात दोन दिवस वाळवावे लागते धान्य
वार्षिक धान्य खरेदी कधी करावी, असे विचारणा करणारे ग्राहकांचे फोन व्यापाऱ्यांकडे येत आहेत. मात्र, गहू, ज्वारीमध्ये ओलसरपणा असतो. तो कमी करण्यासाठी दोन दिवस हे धान्य कडक उन्हात गच्चीत वाळवण्यास ठेवावे लागते. जेणेकरून त्यातील ओलसरपणा कमी होतो व नंतर वर्षभर कीड लागत नाही. यामुळे ढगाळ वातावरणात धान्य खरेदी करू नका व धान्य वाळत घालू नका, नाही तर अवकाळी पावसाने धान्य भिजायचे.
- नीलेश सोमाणी, होलसेल व्यापारी

क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांनी वधारला गहू
अवकाळी पावसाचा फटका महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील शेतीला बसला आहे. गव्हाचा रंग फिक्का पडला आहे. यामुळे मागील तीन आठवड्यात गव्हाचे भाव क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांनी वधारले.

गव्हाच्या किमती
प्रकार दर (प्रतिक्विंटल)

प्युअर शरबती ३१०० ते ४००० रु.
मिनी शरबती २६०० ते ३००० रु.
स्थानिक गहू २४०० ते २६०० रु.
हलक्या प्रतिसरचा गहू २३०० ते २४०० रु.
ज्वारी ३००० ते ४७०० रु.

तांदळाची गोसरडी भारी
प्रकार दर (प्रतिक्विंटल)

सुगंधी चिन्नोर ३५०० ते ३९०० रु.
कोलम ४६०० ते ५१०० रु.
कालीमुछ ४८०० ते ५१०० रु.
बासमती ४००० ते ११००० रु.
इंद्रायणी ५००० ते ५२०० रु.

डाळींचे भाव ‘जैसे थे’
प्रकार दर (प्रतिकिलो)

तूरडाळ १०६-११५ रु.
मसूरडाळ ७३-७६ रु.
मूगडाळ ९२-९८ रु.
उडीद डाळ ९३-९८ रु.
मठ डाळ ९०-१०० रु.
हरभरा डाळ ५८-६२ रु.

दररोज होणारी आवक
२५० टन गहू
८० टन तांदूळ
३० टन डाळ

Web Title: Stop short for the annual grain purchase; Cloudy weather will be dangerous, take it when the sky is dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.