‘हसरं बाळ सुदृढ बाळ’ उपक्रम आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:11 AM2018-07-19T01:11:59+5:302018-07-19T01:12:44+5:30

काय, आपल्या बाळाची झोप पूर्ण होत नाही? त्याचे वस्त्र ओलसर असल्याने ते चिडचिडे झाले आहे? मग या विषयावर सविस्तर व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन होण्यासाठी लोकमत व पॅम्पर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. १९ जुलै) ‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Smiling Baby- Healthy Baby | ‘हसरं बाळ सुदृढ बाळ’ उपक्रम आज

‘हसरं बाळ सुदृढ बाळ’ उपक्रम आज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : काय, आपल्या बाळाची झोप पूर्ण होत नाही? त्याचे वस्त्र ओलसर असल्याने ते चिडचिडे झाले आहे? मग या विषयावर सविस्तर व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन होण्यासाठी लोकमत व पॅम्पर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. १९ जुलै) ‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
आहे.
तापडिया नाट्यमंदिर, निराला बाजार येथे दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत हा कार्यक्रम होईल. आई होणे हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. नव्हे तिचा तो नवा जन्मच असतो. त्यानंतर सुरू होते आई- बाळाच्या वात्सल्याचे नाते. बाळ जन्मल्यापासून ते स्वत:ची काळजी घेण्याची पात्रता येईपर्यंत त्याची वाढ व विकास यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असते.
या काळात बाळाच्या संगोपनात, वात्सल्याचा वर्षाव करण्यात माता तहान- भूक, दिवस-रात्र विसरून जाते. बाळाची तब्येत थोडीशी खराब झाली किंवा झोप पूर्ण होत नसेल किंवा ते चिडचिडे झाले तर आईची काळजी वाढते. अनेकदा कपडे ओलसर असल्यानेही बाळाची चिडचिड
वाढते.
बाळाची ही चिडचिड होत असताना त्याला पॅम्पर्स पॅन्टस् घातली तर तो कोरडेपणा अनुभवून निवांत झोपेल. अशा एक ना अनेक समस्या चुटकीसरशी सोडविण्यासाठी खास लोकमत व पॅम्पर्स ‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ हा उपक्रम आपणासाठी घेऊन आले आहे. आपल्या व आपल्या बाळाच्या सुदृढ आयुष्यासाठी या कार्यक्रमाची अनुभूती प्रत्येक आर्ईने घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले.
‘हसरे बाळ, सुदृढ बाळ’ या उपक्रमांतर्गत बाळ आणि आई या दोघांच्या ‘सेल्फी’ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान तापडिया नाट्यमंदिरात हे प्रदर्शन भरविण्यात येईल.
या कार्यक्रमांतर्गत बालरोगतज्ज्ञ डॉ. जयंत दत्तात्रय तुपकरी उपस्थिताना मार्गदर्शन करतील. औरंगाबाद बालरोग संघटनेचे माजी अध्यक्ष असणाऱ्या डॉ. तुपकरी यांना या क्षेत्राचा २७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले असून, ते यासंदर्भातील त्यांचे अनुभव तसेच बाळाचे संगोपन याविषयी बोलतील.

Web Title: Smiling Baby- Healthy Baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.