४ मार्चपासून रंगणार शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:36 AM2018-02-19T00:36:06+5:302018-02-19T00:36:17+5:30

औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कामगार, कर्मचारी व अधिकाºयांसाठी गत २७ वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येत असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेस ४ मार्चपासून प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा एमजीएम स्पोटर््स क्लब मैदानावर होणार आहे.

 Shaheed Bhagat Singh Industrial Cricket Tournament will be played from 4th March | ४ मार्चपासून रंगणार शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धा

४ मार्चपासून रंगणार शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धा

googlenewsNext

औरंगाबाद : औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कामगार, कर्मचारी व अधिकाºयांसाठी गत २७ वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येत असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेस ४ मार्चपासून प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा एमजीएम स्पोटर््स क्लब मैदानावर होणार आहे.
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेची मान्यता असलेल्या या स्पर्धेसाठी पंचही पात्रताधारक, मान्यताप्राप्त आणि अनुभवी आहेत. या स्पर्धेत सहभागी संघात त्या उद्योगातील दहा कामगार, कर्मचारी खेळाडू असणे बंधनकारक आहे व तीन खेळाडू इतर संस्थेमधील तसेच दोन खेळाडू ओपनमधून घेता येऊ शकतात. या स्पर्धेत जास्तीत जास्त उद्योगातील संघांना सहभाग घेता यावा यासाठी नियमात बदल करण्यात आले आहेत. विजेत्या संघास ३१ हजार रुपये व करंडक प्रदान केला जाणार आहे. उपविजेत्या संघास २१ हजार रुपये व करंडक तसेच प्रत्येक सामन्यातील सामनावीर, मालिकावीर, सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज अशी बक्षिसेही दिली जाणार आहेत. या स्पर्धेत ज्या संघांना सहभाग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी प्रवेशिका सीटू भवन, अजबनगर येथे उपलब्ध आहे. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख ही २२ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेची सोडत रविवार, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सर्व कर्णधारांच्यासमोर सीटू भवन, अजबनगर येथे काढण्यात येणार आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजक दामोदर मानकापे, राजेश सिद्धेश्वर, गंगाधर शेवाळे, अनंत नेरळकर, उदय बक्षी, संदीप भंडारी, सागर वैद्य, राकेश सूर्यवंशी, सचिन पाटील, अजय देशपांडे आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title:  Shaheed Bhagat Singh Industrial Cricket Tournament will be played from 4th March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.