शरद कारखान्याच्या चेअरमनपदी संदीपान भुमरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:43 AM2017-10-18T00:43:52+5:302017-10-18T00:43:52+5:30

विहामांडवा येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी पैठणचे आ. संदीपान पाटील भुमरे, व्हॉइस चेअरमनपदी माणिकराव थोरे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच पाचोडसह परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

 Sandipan Bhumre becomes chairman of Sharad sugar Factory | शरद कारखान्याच्या चेअरमनपदी संदीपान भुमरे

शरद कारखान्याच्या चेअरमनपदी संदीपान भुमरे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोड : विहामांडवा येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी पैठणचे आ. संदीपान पाटील भुमरे, व्हॉइस चेअरमनपदी माणिकराव थोरे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच पाचोडसह परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
शरद कारखान्याची नुकतीच निवडणूक पार पडली. त्यात आ. भुमरे यांनी प्रतिस्पर्धी पॅनलला धूळ चारून कारखान्यावर आपले वर्चस्व निर्माण केले होेते. मंगळवारी कारखान्याच्या चेअरमनपदाची निवडणूक पार पडली. यावेळी चेअरमनपदी आ. संदीपान भुमरे यांची, तर व्हॉइस चेअरमनपदी माणिकराव थोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी जि.प. अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर कापसे पाटील, विनोद बोंबले, पैठण कृउबा समितीचे सभापती राजू भुमरे, सरपंच मनीषा तारे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुनील मेहेत्रे, गणेश थोरे, लक्ष्मण बनकर, राहुल नारळे, भागवत नरवडे, भाऊसाहेब नरवडे, मनोज नरवडे आंबादास नरवडे आदींची उपस्थिती होती.

Web Title:  Sandipan Bhumre becomes chairman of Sharad sugar Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.