आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:19 AM2017-09-22T01:19:26+5:302017-09-22T01:19:26+5:30

ग्रामपंचायत निवडणुकांच्या सरपंच व सदस्यपदासाठी अर्ज भरण्यास एकच दिवस शिल्लक राहिल्याने इच्छुकांनी आपले सरकार केंद्र व महाईसेवा केंद्रावर एकच गर्दी केली होती.

Runway to fill the online nomination | आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी धावपळ

आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी धावपळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ग्रामपंचायत निवडणुकांच्या सरपंच व सदस्यपदासाठी आॅनलाइन अर्ज भरताना गुरुवारी इच्छुक उमेदवारांची दमछाक झाली. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा खंडित झाल्यामुळे उमेदवरांना ताटकळत बसावे लागले. आठही तालुक्यांतील तहसील कार्यालयासंमोर दिवसभर गर्दी दिसून आली.
जालना तालुक्यातील २९, बदनापूर १४, अंबड ३८, परतूर ४१, मंठा ३५, घनसावंगी २६, भोकरदन ३२, जाफराबादमधील १५ अशा २३० ग्रामपंचायतींसाठी मतदान सात आॅक्टोबरला होत आहे. सरपंच व सदस्यपदासाठी इच्छुकांना २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहे. दरम्यान, पितृपक्षामुळे मागील आठवड्यात बहुतांश उमेदवारांनी अर्ज भरण्यास उत्सुकता दाखवली नाही. मात्र, आता अर्ज भरण्यास एकच दिवस शिल्लक राहिल्याने इच्छुकांनी आपले सरकार केंद्र व महाईसेवा केंद्रावर एकच गर्दी केली होती. जालना तहसीलसमोर सकाळपासूनच प्रचंड गर्दी पहायला मिळाली.
अनेक उमेदवार जातप्रमाणपत्र व अन्य कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करताना दिसून आले. दरम्यान, आॅनलाईन अर्ज भरताना अडचणी येत असल्याचे नेर येथील काही इच्छुकांनी सांगितले. अनेक उमेदवार आॅनलाइन दाखल केलेले अर्ज पुन्हा तहसील कार्यालयात आणून संबंधित अधिका-यांना दाखविताना दिसले. भोकदरन तहसील कार्यालयासमोर इच्छुकांनी गर्दी केली होती.
या परिसरातील इंटरनेटसेवा तीन तास ठप्प झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. अंबड तहसीलमध्ये आॅनलाइन प्राप्त अर्जांची माहिती एकत्रित करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी गुुरुवारी सरंपच पदाचे ३९ तर सदस्यपदासाठी १४२ अर्ज प्राप्त झाले झाल्याचे तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी सांगितले. बदनापूरमधील १४ ग्रामपंचायतींसाठी गुरुवारी सरपंचपदासाठी ३८ अर्ज प्राप्त झाले. सरपंच पदासाठी २० महिला व १८ पुरुषांनी अर्ज केले आहेत. सदस्यपदासाठी ८१ महिला व ५४ पुरुष उमेदवारांनी एकूण १३५ आॅनलाइन अर्ज भरले आहेत. २५ व २६ सप्टेंबरला प्राप्त अर्जांची छाननी होणार असून, २७ सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. यंदा निवड थेट जनतेतून होणार असल्याने सरपंचाला पक्षाऐवजी निवडणूक विभागाकडून प्राप्त चिन्हावर लढवावी लागेल.

Web Title: Runway to fill the online nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.