राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या रिद्धी, सिद्धीची गोल्डन कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:04 AM2019-05-08T01:04:19+5:302019-05-08T01:04:43+5:30

पुणे येथे नुकत्याच झालेल्या ५५ व्या कनिष्ठ राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या प्रतिभावान खेळाडू रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी आपला विशेष ठसा उमटवताना पदकांची लूट केली. सिद्धी हत्तेकर हिने दोन सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली, तर रिद्धीने एक सुवर्णपदक जिंकताना महाराष्ट्राच्या यशात निर्णायक योगदान दिले.

Riddhi, Siddhi's golden performance in Aurangabad National Gymnastics Championship | राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या रिद्धी, सिद्धीची गोल्डन कामगिरी

राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या रिद्धी, सिद्धीची गोल्डन कामगिरी

googlenewsNext

औरंगाबाद : पुणे येथे नुकत्याच झालेल्या ५५ व्या कनिष्ठ राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या प्रतिभावान खेळाडू रिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी आपला विशेष ठसा उमटवताना पदकांची लूट केली.
सिद्धी हत्तेकर हिने दोन सुवर्ण व एक रौप्यपदकाची कमाई केली, तर रिद्धीने एक सुवर्णपदक जिंकताना महाराष्ट्राच्या यशात निर्णायक योगदान दिले. खेलो इंडियातही या जुळ्या बहिणींनी जबरदस्त कामगिरी केली होती. पुणे येथील नुकत्याच झालेल्या स्पर्धेत सिद्धी हत्तेकर हिने १५ वर्षांखालील मुलींच्या गटात टेबल व्हॉल्ट या साधन प्रकारात ११.५५ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. तसेच तिने अनइव्हन बार या साधन प्रकारात ७.९० गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली. याच स्पर्धेत सिद्धी हत्तेकरने सांघिक सुवर्णपदकही जिंकले. रिद्धी हत्तेकर हिनेही सांघिक सुवर्णपदकाची कमाई केली. रिद्धी व सिद्धी या जुळ्या बहिणी शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या दहावीच्या विद्यार्थिनी आहेत. सर्वसाधारण विजेतेपद स्पर्धेत सिद्धी हत्तेकरला चौथे राष्ट्रीय नामांकन व रिद्धी हत्तेकरला आठवे नामांकन मिळाले आहे. या दोघींना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल ‘साई’च्या संचालिका सुश्मिता ज्योत्सी, उपसंचालक व्ही. के. शर्मा, महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव व आंतरराष्ट्रीय पंच डॉ. मकरंद जोशी, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, प्रशिक्षिका तनुजा गाढवे, पिंकी देब, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. संकर्षण जोशी, सचिव सागर कुलकर्णी, आदित्य जोशी, रणजित पवार, विशाल देशपांडे यांनी रिद्धी व सिद्धीचे अभिनंदन केले आहे.

 

Web Title: Riddhi, Siddhi's golden performance in Aurangabad National Gymnastics Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.