‘त्या’ कुंटणखान्यावर पुन्हा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:16 AM2018-01-22T00:16:46+5:302018-01-22T00:16:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : स्वत:च्या बंगल्यात मुलींकडून देहविक्री करून घेणाºया अहिंसानगरातील आंटीच्या घरावर अनैतिक मानवीय देह वाहतूक कक्ष ...

Reprinted on 'That' charioteer | ‘त्या’ कुंटणखान्यावर पुन्हा छापा

‘त्या’ कुंटणखान्यावर पुन्हा छापा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : स्वत:च्या बंगल्यात मुलींकडून देहविक्री करून घेणाºया अहिंसानगरातील आंटीच्या घरावर अनैतिक मानवीय देह वाहतूक कक्ष आणि शहर गुन्हेशाखेने रविवारी दुपारी एकत्रित छापा मारला. या कारवाईत आंटी, दलाल, ग्राहकास अटक केली आणि तीन तरुणींची मुक्तता केली.
आंटी शोभा वसंत शुक्ला (रा. अहिंसानगर), ग्राहक राजेंद्र आसाराम दहाडे (रा. संजयनगर) अशी आरोपींची नावे आहेत. बीड येथे मराठवाडास्तरीय अनैतिक मानवीय देह वाहतूक कक्ष कार्यरत आहे. औरंगाबाद शहरात देहविक्री होत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. हे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी उपअधीक्षक भरत गाडे यांचे पथक रविवारी शहरात आले. पथकाने गुन्हेशाखेच्या अधिका-यांना सोबत घेऊन सातारा परिसर, मुकुंदवाडी, एमआयडीसी वाळूज आणि अहिंसानगरातील संशयित ठिकाणांवर डमी ग्राहक पाठवून चाचपणी केली. दुपारी ३.४० वाजेच्या सुमारास पथकाने अहिंसानगरात एका घरी बनावट ग्राहक पाठविला. तेव्हा त्या आंटीने पाचशे ते आठशे रुपये दराच्या २५ ते ३० वयोगटातील तीन वेगवेगळ्या तरुणी ग्राहकासमोर उभ्या केल्या. ग्राहकाने आंटीला पैसे दिले आणि त्याने बाहेर पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी घरावर धाड मारली. तेथे आंटीसह, एक दलाल आणि ग्राहक हाती लागला. या तरुणींपैकी एक बीड येथील तर दोन शहरातील आहे. गुन्हेशाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे, नंदकुमार भंडारी यांच्यासह अन्य सहा कर्मचा-यांनी सहभाग घेतला.
पोलिसांनी धाड मारलेल्या आंटीच्या घरावर यापूर्वी आॅक्टोबरमध्ये गुन्हेशाखेने कारवाई केली होती. त्या गुन्ह्यात तिला जामीन मिळाल्यानंतर तिने कुंटणखाना सुरूच ठेवल्याचे आजच्या कारवाईवरून समोर आले. ती ग्राहकांकडून पाचशे ते आठशे रुपये उकळत.

Web Title: Reprinted on 'That' charioteer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.