‘मघा’च्या रिपरिपीने पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:47 AM2017-08-20T00:47:22+5:302017-08-20T00:47:22+5:30

तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात सर्वदूर आगमन करून माना टाकलेल्या पिकांना जीवदान दिले आहे़ शनिवारी ‘मघा’ च्या रिपरिपीने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ नांदेड शहरात सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाची रिमझिम रात्री उशिरापर्यंत सुरूच होती़ जिल्ह्यात अडीच महिन्यात केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून ३१६ मि़ मी़ सरासरी पावसाची नोंद आहे़

Recipe from Magha's Recipe Lives Crops | ‘मघा’च्या रिपरिपीने पिकांना जीवदान

‘मघा’च्या रिपरिपीने पिकांना जीवदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात सर्वदूर आगमन करून माना टाकलेल्या पिकांना जीवदान दिले आहे़ शनिवारी ‘मघा’ च्या रिपरिपीने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ नांदेड शहरात सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाची रिमझिम रात्री उशिरापर्यंत सुरूच होती़ जिल्ह्यात अडीच महिन्यात केवळ ३३ टक्के पाऊस झाला असून ३१६ मि़ मी़ सरासरी पावसाची नोंद आहे़
यंदा मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर शेतकºयांनी पेरण्या केल्या परंतु त्यानंतर रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसूू, पुष्य, आश्लेषा हे महत्वाचे नक्षत्र कुचकामी ठरले़ या दरम्यान पाऊस चांगलाच रूसून बसला़ हातचा गेलेला खरीप हंगाम व पिण्याच्या पाण्याचे संकट दारात उभे होते़ त्यामुळे दुष्काळाचे ढग दाटून आले होते़ परंतु हवामान विभागाने दोन दिवसापूर्वी १९ आॅगस्ट रोजी अतिवृष्टी होईल, असे भाकीत केले़ आणि या अंदाजाने शेतकºयांना दिलासा मिळाला़ मागील तीन, चार दिवसापासून ढगाळ वातावरण होते़ दाटून आलेले ढग कधी बरसतील, याचीच सर्वांनाच प्रतिक्षा होती़ अखेर शनिवारी सकाळपासून रिमझीम पावसाला सुरूवात झाली़ परंतु दमदार पाऊस झाला नाही़ त्यामुळे अतिवृष्टीचा अंदाजही खोटा ठरला़ आता २३ आॅगस्ट रोजी अतिवृष्टी होण्याचे संकेत दिले आहेत़
जिल्ह्यात यंदा ८ हजार ५४ हेक्टर पेरणीचे क्षेत्र होते़ त्यापैकी ७ हजार ७६६ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ९६़४२ टक्के पेरणी करण्यात आली आहे़ त्यामध्ये १२५२़१६ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य तर १८८०़२६ हेक्टर क्षेत्रावर अन्नधान्य घेण्यात आले आहे़ तर मुख्य पीक असलेल्या कापसाची २ हजार ६९७़७९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे़ पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता़ मात्र आता या रिमझिम पावसाने का होईना पिकांना जीवदान मिळाले आहे़
शनिवारी झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते चिखलमय झाले असून हिंगोली गेट परिसरात पाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या होत नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते़ परिणामी हिंगोली गेट उड्डाण पुलाखाली असलेले फुल मार्केट पाण्याखाली गेल्याने फुलविक्रेत्यांची तारांबळ उडाली होती़
मृग नक्षत्रात झालेल्या पावसानंतर मोठा पाऊस झाला नाही़ यंदाच्या पावसाळ्यातील दिवसभर पाऊस सुरू राहणारा शनिवार हा पहिला दिवस ठरला आहे़ यापुुर्वी ढगाळवातावरण राहीले़ परंतु, दिवसभर रिपरिप नांदेडकरांना अनुभवायला मिळाली नाही़
शुक्रवारी सायंकाळनंतर वातावरणात बदल झाला़ रात्री हलका पाऊसदेखील झाला़ शनिवारी पहाटेपासून ढगाळ वातावरण होते़ दरम्यान, सकाळी साडेनऊ वाजेपासून रिमझिम पावसाचे आगमन सुरू झाले़ यानंतर दिवसभर अधुुनमधुन पाऊसाची रिमझिम सुरूच होती़ परंतु, या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले़ अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दिवसभर सुरू राहिलेल्या पावसाचा चाकरमान्यांनी आनंद लुटला़

Web Title: Recipe from Magha's Recipe Lives Crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.