‘रॅन्समवेअर’चा धसका; लातूरचा सायबर सेल अलर्ट !

By Admin | Published: May 19, 2017 12:04 AM2017-05-19T00:04:01+5:302017-05-19T00:04:35+5:30

लातूर : रॅन्समवेअरच्या हल्ल्याची धास्ती जगभर असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस प्रशासनानेही सतर्कतेचे आवाहन सायबर सेलला केले आहे.

The 'rainbowware' scare; Latur's cyber cell alert! | ‘रॅन्समवेअर’चा धसका; लातूरचा सायबर सेल अलर्ट !

‘रॅन्समवेअर’चा धसका; लातूरचा सायबर सेल अलर्ट !

googlenewsNext

राजकुमार जोंधळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : जगभर धुमाकूळ घालणाऱ्या ‘वन्नाक्राय’ या रॅन्समवेअरनंतर सुरक्षेचे सारे उपाय योजले जात आहेत. रॅन्समवेअरच्या हल्ल्याची धास्ती जगभर असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस प्रशासनानेही सतर्कतेचे आवाहन सायबर सेलला केले आहे. यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलातील सायबर सेल अलर्ट झाला आहे.
जगभर रॅन्समवेअरच्या हल्ल्यानंतर खडबडून जागे झालेल्या ‘नेट’कऱ्यांमध्ये कमालीची धास्ती आहे. बनावट मेलच्या माध्यमातून असा हल्ला होण्याची शक्यता असल्याने संगणक हाताळणाऱ्यांनी अधिक दक्षता बाळगली पाहिजे. विशेषत: आॅनलाईन व्यवहार आणि इंटरनेटचा वापर करताना सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी आता लातूरच्या सायबर सेलने नागरिकांना आवाहन केले आहे. बनावट मेलपासून नागरिकांनी सावधानता बाळगावी. शिवाय, अनोळखी मेल उघडू नये. या मेलला कुठलाही प्रतिसाद न देता ते डिलीट् करून टाकावेत. अनोळखी नावाने आलेला मेसेज आणि मेल हा एखाद्या व्यक्तीची फसवणूक करू शकतो. विशेषत: मोबाईलवर आलेले मेसेज आणि आॅनलाईन खरेदीच्या नावाखाली करण्यात आलेल्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर आहेत. या जाहिरातींच्या माध्यमातून आॅनलाईन खरेदी करताना आधार लिंकिंग अथवा एटीएम कार्ड क्रमांक किंवा पॅनकार्ड क्रमांक आणि इतर माहिती मागितली जाते. एखाद्या कंपनीच्या नावाखाली बनावट मेलही अशी माहिती मागविण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक मेल आणि मोबाईलवर आलेले मेसेज काळजीपूर्वक वाचून, खात्री करून त्यासंबंधीचे व्यवहार करणे अधिक फायद्याचे ठरेल. रॅन्समवेअरच्या हल्ल्यानंतर जगभरासह महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनही अधिक सतर्क झाले आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाअंतर्गत कार्यरत असलेला सायबर सेल अलर्ट झाला असून, त्यासंबंधीच्या सूचनाही लातूरच्या सायबर सेलला प्राप्त झाले आहेत.

Web Title: The 'rainbowware' scare; Latur's cyber cell alert!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.