औरंगाबादकरांसाठी वाईट बातमी;सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी रद्द 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 02:55 PM2018-12-01T14:55:52+5:302018-12-01T14:56:50+5:30

सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने रद्द केली आहे. 

Permission of Animal Museum in Siddhartha Garden of Aurangabad cancelled | औरंगाबादकरांसाठी वाईट बातमी;सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी रद्द 

औरंगाबादकरांसाठी वाईट बातमी;सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी रद्द 

googlenewsNext

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने रद्द केली आहे.  प्राधिकरणाने सहा महिन्यापूर्वीच महापालिकेला परवानगी रद्द करण्या संबंधी नोटीस दिली होती. प्राधिकरणाने उपस्थित केलेल्या मुद्द्यावर महापालिकेने कोणत्याच उपाय योजना केल्या नाहीत.

पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय सिद्धार्थ उद्यानात आहे. येथे नियमांची पायमल्ली झाल्याने केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयाला नोटीस दिली होती. प्राधिकरणाने नोटीस द्वारे, प्राणी संग्रहालयाला पुरेशी जागा नाही, प्राण्यांना ठेवण्यात आलेले पिंजरे नियमानुसार नाहीत., प्राण्यांना नैसर्गिक वातावरण मिळत नाही अशा अनेक नियमांची पायमल्ली होतेय असे मुद्दे उपस्थित करून हे संग्रहालय बंद का करू नये ? अशी विचारणा केली. 

यावर नोटीसवर महानगरपालिकेला समाधानकारक तोडगा काढता आला नाही. यामुळे अखेर शहराचे आकर्षण असणाऱ्या या प्राणी संग्रहालयाची परवानगी प्राधिकरणाने आज रद्द केली. 

Web Title: Permission of Animal Museum in Siddhartha Garden of Aurangabad cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.