पीकविम्यात हिंगोली तिसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:42 AM2017-07-26T00:42:44+5:302017-07-26T00:44:05+5:30

हिंगोली : जिल्ह्यात पीकविमा काढणाºया शेतकºयांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यंदा निसर्गही लहरीपणा दाखवत असल्याने शेतकºयांनी पीकविमा काढण्यासाठी गर्दी केली आहे.

paikavaimayaata-haingaolai-taisaraa | पीकविम्यात हिंगोली तिसरा

पीकविम्यात हिंगोली तिसरा

googlenewsNext
ठळक मुद्देआॅनलाईन विमा काढणाºया बिगर कर्जदार शेतकºयांमुळे हिंगोली जिल्हा राज्यात तिसरा आहे.पीकविम्याची साथ मिळावी म्हणून शेतकरी धडपडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात पीकविमा काढणाºया शेतकºयांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यंदा निसर्गही लहरीपणा दाखवत असल्याने शेतकºयांनी पीकविमा काढण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र वेबसाईटच हँग होत असल्याने दोन-दोन दिवस ताटकळणारे शेतकरी आता कृषी कार्यालयाचे खेटे घालत आहेत.
गेल्या हंगामात शेतकºयांना पीकविम्यापोटी तब्बल ११२ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यामुळे यंदाही शेतकºयांनी पीकविमा काढण्याकडे कल वाढविला आहे. त्यातच यंदा पावसानेही हुलकावणी दिली आहे. सुरुवात चांगली झाली. मात्र आता गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान असल्याचे दिसत आहे. यावर्षी २७२ मिमी एवढे पर्जन्य झाले तर गतवर्षी याच दिवसांपर्यंत ४५0 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे अजूनही जलसाठे कोरडेच आहेत. पावसाने अशीच हुल दिली तर पीकविम्याची तर साथ मिळावी म्हणून शेतकरी धडपडत आहेत. ३१ जुलै ही अंतिम मुदत असल्याने शेतकºयांना आता विमा काढण्याची घाई झाली आहे. मात्र कदाचित सर्वत्रच अशी परिस्थिती असल्याने वेबसाईट हँग होत आहे. त्यामुळे शेतकºयांना ताटकळत बसावे लागत आहे. मात्र पीककर्ज घेणाºया २७ हजार शेतकºयांचा विमा त्यासोबतच बँकेत भरला गेला आहे. त्यामुळे बिगर कर्जदार १६ हजार धरून ४३ हजार शेतकºयांनी पीकविमा काढला आहे.
मराठवाडा अव्वल
आॅनलाईन विमा काढणाºया बिगर कर्जदार शेतकºयांमुळे हिंगोली जिल्हा राज्यात तिसरा आहे. यात नांदेड- ८८९७३, बीड-४६७0७ शेतकºयांनी पीकविमा काढला. हिंगोली तिसरा आहे. तर चौथ्यास्थानी असलेल्या परभणीत १५८९६, जालना-१११00, बुलडाणा-५0८२, उस्मानाबाद-५३0९, लातूर-३६६१, यवतमाळ-२३0८, अहमदनगर-१४४0, औरंगाबाद-१३९0 अशी परिस्थिती आहे. मराठवाड्यातील शेतकºयांनी सर्वाधिक पीकविमा काढला आहे. तर सिंधूदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांचा पीकविम्याकडे कलच नसून शेतकरीसंख्या दुहेरी आकड्यातही नाही.

Web Title: paikavaimayaata-haingaolai-taisaraa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.