जन्मदात्रीचा सांभाळ न करता घराबाहेर काढले; तीन मुलांसह सुनेविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:31 PM2019-05-05T23:31:19+5:302019-05-05T23:31:40+5:30

जन्मदात्रीचा सांभाळ न करता तिला घराबाहेर हकलून देणाऱ्या तीन मुलांसह सुनेविरुद्ध सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना ३ मे रोजी सकाळी हडकोतील स्वामी विवेकानंदनगरात घडली.

Out of the house without taking care of the orbital; Crime against hearing with three children | जन्मदात्रीचा सांभाळ न करता घराबाहेर काढले; तीन मुलांसह सुनेविरोधात गुन्हा

जन्मदात्रीचा सांभाळ न करता घराबाहेर काढले; तीन मुलांसह सुनेविरोधात गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देसिडको पोलिसांकडून तपास : मुले करतात खाजगी नोकरी

औरंगाबाद : जन्मदात्रीचा सांभाळ न करता तिला घराबाहेर हकलून देणाऱ्या तीन मुलांसह सुनेविरुद्ध सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना ३ मे रोजी सकाळी हडकोतील स्वामी विवेकानंदनगरात घडली.
संदीप एकनाथ कोतकर, सचिन एकनाथ कोतकर, सुनील एकनाथ कोतकर आणि सुनेचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, स्वामी विवेकानंदनगरात ६० वर्षीय महिला तिची तीन मुले आणि सुनांसह राहते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आई आणि मुले, सून यांच्यात सतत वाद होत आहे. त्यामुळे तिन्ही मुले आणि सुनांंनी वृद्धेचा सांभाळ करण्यास नकार देत आईला जेवण देणे बंद केले. शुक्रवारी सकाळी त्यांनी जन्मदात्रीला घराबाहेर हकलून दिले. या घटनेनंतर दुसºया दिवशी वृद्धेने सिडको पोलीस ठाणे गाठून मुले आणि सून यांच्याविरोधात तक्रार नोंदविली. पोलीस हेड कॉन्स्टेबल सिरसाट तपास करीत आहेत.

Web Title: Out of the house without taking care of the orbital; Crime against hearing with three children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.