कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा नवा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:45 AM2017-09-14T00:45:55+5:302017-09-14T00:45:55+5:30

कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज दाखल करताना इंटरनेट आणि वेबसाईटच्या व्यत्ययामुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे. आता पुन्हा कर्जमाफीच्या अर्जासह अन्य कागदपत्रे बँकेत दाखल करण्याचा नवा फतवा काढला असून त्यालाही अवघ्या तीनच दिवसांची मुदत दिल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

New tax again for loan waiver | कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा नवा फतवा

कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा नवा फतवा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज दाखल करताना इंटरनेट आणि वेबसाईटच्या व्यत्ययामुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे. आता पुन्हा कर्जमाफीच्या अर्जासह अन्य कागदपत्रे बँकेत दाखल करण्याचा नवा फतवा काढला असून त्यालाही अवघ्या तीनच दिवसांची मुदत दिल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.
राज्य शासनाने शेतकºयांसाठी विविध निकष घालून कर्जमाफीची घोषणा केली. त्याला अडीच महिने उलटूनही अद्याप लाभ मिळालाच नसून सदर योजनेत रोजच नवनव्या नियम व अटींची भर पडू लागली असून शासनाने घालून दिलेल्या विविध बाबींची पूर्तता करण्यातच शेतकरी हैराण झाला आहे. सेतू केंद्रावर कर्ज घोषणापत्र आॅनलाईन दाखल करण्याची अट शासनाकडून टाकल्यामुळे सेतू केंद्रावर मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यातच वारंवार इंटरनेट कनेक्टीव्हिटी खंडित होत असून वेबसाईड हँग होत असल्याने व्यत्यय निर्माण होत आहे. दिवसभर रांगेत उभे टाकुनही अर्ज दाखल होत नसल्याने शेतकºयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अर्ज घोषणापत्र दाखल करण्यासाठी आधारकार्ड, बँक खाते पुस्तक असणे गरजेचे केले असल्याने शेतकºयांना यासाठी पायपीट सहन करावी लागत आहे. आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असून निर्माण होणाºया विविध अडचणीमुळे शेतकºयांची भलतीच तारांबळ उडत आहे. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी एकीकडे मोठा गोंधळ सुरू असताना आता बँकेमध्येसुद्धा कर्जमाफीच्या फॉर्मसह आॅनलाईन अर्ज दाखल केल्याची पावती, कर्ज खात्याची व बचत खात्याचे पासबूक पत्र, आधार कार्ड, सातबारा, होल्डींग, मयत असल्यास मृत्यू प्रमाणपत्र दाखल करण्याचा नवा फतवा शासनाने काढला आहे. गोरेगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत १३ सप्टेंबर रोजी दुपारी बँकेत अर्ज आणि कागदपत्रे दाखल करण्याचा फलक लावला असून त्यावर १६ सप्टेंबरपर्यंत मुदत असल्याचे नमूद आहे. केवळ तीनच दिवसांची मुदत दिल्याने शेतकरी चक्रावून गेला आहे. शासनाकडून लादण्यात येणाºया नवनव्या निर्णय व अटीमुळे पुन्हा अडचण निर्माण झाल्याने शासनाकडून घोषणा करण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान की अवमान योजना ? असा सवाल व्यक्त करीत शेतकºयांमधून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत बँक शाखाधिकारी मनीष कुमार झा यांना विचारले असता ते म्हणाले, वरिष्ठांकडून बँकेमध्ये कर्ज माफीचे अर्ज आणि कागदपत्रे दाखल करून घेण्यास सांगण्यात आले आहे. यावरून कर्जमाफीसाठी यादी शासनाकडे सादर करावयाची असून याद्वारे पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. मुदतीत अर्ज कागदपत्रे दाखल करण्याचे अवाहन त्यांनी केले.

Web Title: New tax again for loan waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.