नाशिकचा औरंगाबादवर डावाने दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:28 PM2017-12-29T23:28:07+5:302017-12-29T23:28:18+5:30

नाशिक संघाने आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या एमसीएच्या १४ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धेत औरंगाबाद संघावर एक डाव आणि ७५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. नाशिकने त्यांचा पहिला डाव ८ बाद ३०५ धावांवर घोषित केला.

Nashik beat Pune War on Aurangabad | नाशिकचा औरंगाबादवर डावाने दणदणीत विजय

नाशिकचा औरंगाबादवर डावाने दणदणीत विजय

googlenewsNext

औरंगाबाद : नाशिक संघाने आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या एमसीएच्या १४ वर्षांखालील निमंत्रित संघांच्या क्रिकेट स्पर्धेत औरंगाबाद संघावर एक डाव आणि ७५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
नाशिकने त्यांचा पहिला डाव ८ बाद ३०५ धावांवर घोषित केला. त्यानंतर औरंगाबादने संकेत पाटीलच्या ४७ धावांच्या बळावर पहिल्या डावात सर्वबाद १२१ धावा केल्या. नाशिककडून रोशन वाघसरे याने ३२ धावांत ५ व साहील बैरागी याने २४ धावांत ३ गडी बाद केले. त्यानंतर फॉलोआॅन घेऊन खेळणाºया औरंगाबादचा दुसरा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे २३.३ षटकांतच १०९ धावांत कोसळला. औरंगाबादकडून दुसºया डावात यशोवर्धन पवार याने ३९, वंश सलगरे याने २० व अंश ठोकळ याने १६ धावा केल्या. नाशिककडून साहील बैरागी याने २६ धावांत ४, आर्यन सोळंकीने ३३ धावांत ३ व आर्यन चव्हाण याने १७ धावांत २ गडी बाद करीत त्यांच्या संघाच्या विजयात निर्णायक योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक
नाशिक (पहिला डाव) : ८ बाद ३०५ (घोषित). औरंगाबाद (पहिला डाव) : १२१. दुसरा डाव : २३.३ षटकांत सर्वबाद १०९. (यशोवर्धन पवार ३९, वंश सलगरे २०, अंश ठोकळ १६. साहील बैरागी ४/२६, आर्यन सोळंकी ३/३३).

Web Title: Nashik beat Pune War on Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.