पंचायत समितीत सदस्यांचा सभात्याग

By Admin | Published: June 23, 2017 11:22 PM2017-06-23T23:22:57+5:302017-06-23T23:24:04+5:30

सेनगाव : येथील पंचायत समिती कार्यालयाच्या अनागोंदी, मनमानी कारभाराला सभापती, उपसभापतीसह सर्वच पंचायत समिती सदस्य वैतागले

Meeting of members of Panchayat Samiti | पंचायत समितीत सदस्यांचा सभात्याग

पंचायत समितीत सदस्यांचा सभात्याग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील पंचायत समिती कार्यालयाच्या अनागोंदी, मनमानी कारभाराला सभापती, उपसभापतीसह सर्वच पंचायत समिती सदस्य वैतागले असून याविरोधात शुक्रवारी मासिक बैठकीच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांनी संतापाला वाट मोकळी करून दिली. आतापर्यंतच्या एकाही मासिक बैठकीच्या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याने सर्व सदस्यांनी सभात्याग केला.
सेनगाव पं.स.चा कारभार काही दिवसांपासून ढेपाळला आहे. कार्यालयात अधिकारी- कर्मचारी नियमित गैरहजर राहत आहेत. नवनियुक्त सभागृह अस्तित्वात आल्यानंतर अद्यापपर्यंत चार मासिक बैठका झाल्या. बैठकीत विविध प्रश्नांवर, समस्येवर घेतलेल्या एकाही ठरावाची अमलबजावणी झाली नसल्याने सर्वच पदाधिकारी मासिक बैठकीत आक्रमक झाले होते. सभापती स्वामी पोहकर यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठक घेतली. या बैठकीस गटविकास अधिकारी बी.आर. ढवळशंख हे गैरहजर होते. बैठकीत सर्व पक्षीय सदस्यांनी एकत्र येवून आजपर्यंत घेतलेल्या किती ठरावाची अमलबजावणी झाली? असा प्रश्न उपस्थित करून सहाय्यक गटविकास अधिकारी पंडित यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने सभापती पोहकर, उपसभापती ममता वडकुते सह पं.स. सदस्य सतोष पोपळघट, सुनील मुंदडा, अ‍ॅड. केशव भालेराव, अशोक जिरवणकर, अशोक कावरखे, छाया हेंबाडे, कलावती पोपळघट, संतोष खंदारे, चंद्रदास इंगोले, मंगला पायघन, रायाजी चोपडे, लता गाजरे, खुशालराव हराळ, अर्चना साबळे, अनिता मानवतकर, अरुणा गडदे, उषा कोटकर, साधना थोरात आदी सदस्यांनी मासिक बैठकीतून सभात्याग केला.

Web Title: Meeting of members of Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.