पत्नीला भेटण्यास गेलेल्या जावयाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 06:30 PM2019-01-14T18:30:40+5:302019-01-14T18:30:52+5:30

सहा महिन्यांपासून माहेरी असलेल्या पत्नीला भेटण्यास गेलेल्या जावयास सासरा व मेव्हण्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री जोगेश्वरी येथे घडली.

 Married to meet his wife | पत्नीला भेटण्यास गेलेल्या जावयाला मारहाण

पत्नीला भेटण्यास गेलेल्या जावयाला मारहाण

googlenewsNext

वाळूज महानगर : सहा महिन्यांपासून माहेरी असलेल्या पत्नीला भेटण्यास गेलेल्या जावयास सासरा व मेव्हण्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री जोगेश्वरी येथे घडली.


अजिनाथ साळवे (२३, रा. जानेफळ, ता. भोकरदन, जि.जालना) याची पत्नी सहा महिन्यांपासून मुलासह माहेरी जोगेश्वरी येथे राहत आहे. अजिनाथ हा शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पत्नी व मुलाला भेटण्यासाठी जोगेश्वरी येथे गेला होता. घरी गेल्यानंतर अजिनाथने पत्नीला आपल्या घराकडे येण्याचा आग्रह केला. तेव्हा सासरा जयकरण बोरडे व मेव्हणा ईश्वर बोरडे यांनी अजिनाथ यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

सासरा व मेव्हणा शिवीगाळ करीत असल्याने अजिनाथने तुम्ही आमच्या दोघांमध्ये बोलू नका, असे सांगितले. असे म्हणत मुलगा आयुष (दीड वर्ष) याला घेऊन घराबाहेर निघाला. तेव्हा जयकरण व ईश्वर यांनी अजिनाथला जबर मारहाण केली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघा बाप-लेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Married to meet his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.