कुंभेफळ येथे विहीर पुनर्भरण कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 06:19 PM2019-06-02T18:19:48+5:302019-06-02T18:20:01+5:30

ह. प.भ. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर यांच्या हस्ते अनिल तुळशीराम शेळके यांच्या शेतात विहीर पुनर्भरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.

Launch of Vine Recharge work at Kumbhafal | कुंभेफळ येथे विहीर पुनर्भरण कामाचा शुभारंभ

कुंभेफळ येथे विहीर पुनर्भरण कामाचा शुभारंभ

googlenewsNext

शेंद्रा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत कुंभेफळ येथे ह. प.भ. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर यांच्या हस्ते अनिल तुळशीराम शेळके यांच्या शेतात विहीर पुनर्भरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.

विहीर पुनर्भरण याकरिता सदर योजनेतून अनुदान मिळणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच सुधीर मुळे यांनी केले.

इंदुरीकर महाराज म्हणाले की लोकांनी जर पाणी अडवून विहीर पुनर्भरणाद्वारे जमिनीत जिरवले तर मराठवाड्यातला दुष्काळ कमी होण्यास वेळ लागणार नाही, यावेळी कृषी सहाय्यक रंगनाथ पिसाळ, गणेश देवळे, कृष्णा गट्टूवार, बबन दिंडोरे, कृषी मित्र सुदाम शेळके, विजुभाऊ गोजे, भगवानराव आदी शेतकरी उपस्थित होते


नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतासाठी पाईपलाईन विहिरीतील पम्प, शेततळे, प्लास्टिक अस्तरीकरण,फळबाग लागवड, भुमिहिन शेतकरी यांच्यासाठी कुकुटपालन, शेळीपालन, बचत गट शेतकरी गट याकरिता सामुदायिक योजना, शेडनेट, पॉलिहाऊस, नाल्यातील गाळ काढणे, सूक्ष्म सिंचन अशा अनेक योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता उपलब्ध असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
 

Web Title: Launch of Vine Recharge work at Kumbhafal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.