औरंगाबाद ते बीड रोडवरील पेट्रोलपंप भेसळीच्या विळख्यात; भाजप पदाधिका-यांना बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 05:49 PM2017-12-12T17:49:09+5:302017-12-12T17:56:39+5:30

परळीतील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप पदाधिका-यांच्या ताफ्यातील वाहनात औरंगाबाद ते बीड रोडवरील भोकरवाडी येथील राजर्षी शाहू  पेट्रोलपंपावर पाणीयुक्त इंधन भरल्याचा प्रकार उघडकीस आला.

Knowledge of adulteration of petrol pump from Aurangabad to Beed Road | औरंगाबाद ते बीड रोडवरील पेट्रोलपंप भेसळीच्या विळख्यात; भाजप पदाधिका-यांना बसला फटका

औरंगाबाद ते बीड रोडवरील पेट्रोलपंप भेसळीच्या विळख्यात; भाजप पदाधिका-यांना बसला फटका

googlenewsNext
ठळक मुद्देऔंरगाबाद शहरातील पेट्रोलपंपावर भेसळयुक्त इंधन वाहनात भरण्याचा प्रकार काही दिवसांपुर्वीच उघडकीस आल्यानंतर औरंगाबाद ते बीड रोडवरील पेट्रोलपंप संशयाच्या भोव-यात सापडले आहेत. भाजप पदाधिका-यांच्या ताफ्यातील वाहनात औरंगाबाद ते बीड रोडवरील भोकरवाडी येथील राजर्षी शाहू  पेट्रोलपंपावर पाणीयुक्त इंधन भरल्याचा प्रकार उघडकीस आला.

औरंगाबाद : परळीतील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी निघालेल्या भाजप पदाधिका-यांच्या ताफ्यातील वाहनात औरंगाबाद ते बीड रोडवरील भोकरवाडी येथील राजर्षी शाहू  पेट्रोलपंपावर पाणीयुक्त इंधन भरल्याचा प्रकार उघडकीस आला. इतर नागरिकांच्या वाहनातही पाणीयुक्त इंधन भरल्यामुळे ती वाहने बंद पडली. औंरगाबाद शहरातील पेट्रोलपंपावर भेसळयुक्त इंधन वाहनात भरण्याचा प्रकार काही दिवसांपुर्वीच उघडकीस आल्यानंतर औरंगाबाद ते बीड रोडवरील पेट्रोलपंप संशयाच्या भोव-यात सापडले आहेत. मराठवाड्यातील सर्वच पेट्रोलपंप तपासण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे. 

इतर वाहनांनी गेवराईपर्यंत प्रवास करून भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड, बालाजी मुंडे व इतर पदाधिकारी टॅक्सीने परळीकडे रवाना झाले. त्यांच्या चारचाकीलाही टोचण लावून गेवराईपर्यंत नेल्यानंतर तेथे दुरस्तीसाठी संबंधित वाहनाच्या मोबाईलगॅरेजच्या हवाली करण्यात आले. राजर्षी शाहू पेट्रोलपंपावर भाजप पदाधिका-यांनी इंधन भरल्यानंतर फॉर्च्यूनर चालु झालीच नाही. इतर नागरिकांची वाहने देखील इंधन भरल्यानंतर सुरू झाली नाहीत. त्यामुळे वाहनातील इंजिनमध्ये तपासणी केली असता पाणी आणि इंधन एकत्रच बाहेर आले. याप्रकरणी डॉ.कराड यांनी जालना पुरवठा अधिकारी आर.एस.नंदकर यांच्याकडे तक्रार केली. शिवाय हिंदूस्तान पेट्रोलियमचे विक्री व्यवस्थापक थॉमस यांच्याकडेही घडलेला प्रकार सांगितला. 

पुरवठा अधिकारी म्हणाले,
जालन्याचे पुरवठा अधिकारी नंदकर यांनी सांगितले, औरंगाबादेत एच.पी.चे विक्री अधिका-यांचे कार्यालय आहे.त्यांना याप्रकरणी कळविले आहे. तसेच तलाठी आणि मंडळ अधिकाºयाला भोकरवाडीतील त्या पेट्रोलपंपावर इंधनाचे नमुने घेण्यासाठी पाठविले आहे.

Web Title: Knowledge of adulteration of petrol pump from Aurangabad to Beed Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.