तुमची ताकद ओळखा, आरएसएस तुमची मते लुटू इच्छित आहे : चंद्रशेखर आजाद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 08:08 PM2022-10-15T20:08:42+5:302022-10-15T20:09:13+5:30

महाराष्ट्रातले नेते एकत्रित नाहीत. ते विखुरलेले आहेत, भावी पिढ्यांच्या दृष्टीने ही गोष्ट योग्य नाही, अशी खंत आजाद यांनी व्यक्त केली.

Know your strength, RSS wants to steal your votes: Chandrasekhar Azad | तुमची ताकद ओळखा, आरएसएस तुमची मते लुटू इच्छित आहे : चंद्रशेखर आजाद

तुमची ताकद ओळखा, आरएसएस तुमची मते लुटू इच्छित आहे : चंद्रशेखर आजाद

googlenewsNext

औरंगाबाद : आरएसएसचे सूर बदलले आहेत. ते तुमची मते लुटू इच्छित आहेत. त्यांच्या बहकाव्यात येऊ नका. तुमची एक मोठी ताकद आहे. ती ओळखा आणि दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांनी शुक्रवारी येथे केले.

तापडिया नाट्य मंदिरात आयोजित आजाद संवाद मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्र ही क्रांती भूमी आहे. मी महाराष्ट्रात येऊन नवीन विचार व प्रेरणा घेऊन जातो. देशभर फिरून त्याच प्रेरणेतून मी काम करीत असतो. पण महाराष्ट्रातले नेते एकत्रित नाहीत. ते विखुरलेले आहेत, भावी पिढ्यांच्या दृष्टीने ही गोष्ट योग्य नाही, अशी खंत आजाद यांनी व्यक्त केली.भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे, याबद्दलची चीड व्यक्त केली. साप हा चावतच असतो. त्यामुळे आरएसएस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी बांधील राहील, असे समजणे चूक ठरेल, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, या देशाचे शासक बनू, हा विचारच आपण स्वीकारत नाही. राजकारण वाईट असते तर मग ते या लोकांनी का केले असते. आपण संकुचित विचार सोडून देऊन महापुरुषांच्या विचारधारेने चालले पाहिजे. त्यांच्या विचारांची हत्या होऊ देता कामा नये. अत्त दीप भव बना. अण्णाभाऊ साठे म्हणाले, ये आझादी झूठी है, देश की जनता भूखी है, हे आजही खरे आहे. ज्यांची सामाजिक पाळेमुळे रुजलेली आहेत, त्यांना न मागता सर्व काही मिळते. अलीकडेच सर्वांना मिळालेले दहा टक्के आरक्षण हे त्याचे उदाहरण होय. हे आरक्षण संविधानविरोधी असल्याचा आरोप आजाद यांनी यावेळी केला.

Web Title: Know your strength, RSS wants to steal your votes: Chandrasekhar Azad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.