मराठवाड्यात ३ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:37 PM2018-02-13T23:37:37+5:302018-02-13T23:37:46+5:30

नवीन वर्ष मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरत असल्याचे दिसू लागले आहे. कालपर्यंत फक्त येणार म्हणून चर्चा होत असलेल्या कंपन्यांसोबत दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाने सामंजस्य करार करण्याचा सपाटा सुरू केला आहे. ३ हजार पैकी १५०० कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. सुमारे १५०० कोटींचे करार विविध उद्योगांसोबत होणार असल्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड, लातूरमध्ये औद्योगिक उलाढालीसह रोजगार निर्मितीला चालना मिळणे शक्य होईल, असे वाटते आहे.

An investment of Rs. 3,000 crores in Marathwada | मराठवाड्यात ३ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार

मराठवाड्यात ३ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार

googlenewsNext
ठळक मुद्देडीएमआयसी, एमआयडीसी : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूरमध्ये उद्योगांना चालना

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नवीन वर्ष मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरत असल्याचे दिसू लागले आहे. कालपर्यंत फक्त येणार म्हणून चर्चा होत असलेल्या कंपन्यांसोबत दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाने सामंजस्य करार करण्याचा सपाटा सुरू केला आहे. ३ हजार पैकी १५०० कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. सुमारे १५०० कोटींचे करार विविध उद्योगांसोबत होणार असल्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड, लातूरमध्ये औद्योगिक उलाढालीसह रोजगार निर्मितीला चालना मिळणे शक्य होईल, असे वाटते आहे.
२५ देशांमध्ये युनानी औषधी निर्यात करणाºया हमदर्द लॅबोरेटरिज लिमिटेडचे औरंगाबादेतून लवकरच उत्पादन होणार आहे. दिल्लीनंतर चौथा प्रकल्प औरंगाबादेत सुरू करण्यात येणार असून, सुमारे ३ एकर जागा कंपनीला एमआयडीसीने दिली आहे. आॅक्टोबर २०१८ पासून त्या प्रकल्पात उत्पादन सुरू होण्याचा दावा करण्यात येत आहे. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत ही कंपनी १६५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, यातून २०० जणांना येथे रोजगार मिळू शकेल. वाळूजमध्ये बाळकृष्ण इंडस्ट्रीजने १०० कोटींच्या गुंतवणुकीतून १५०० जणांना तर पॅरासॅन व्हेंचर्सतर्फे पैठणमध्ये ९५ कोटींसह ६०० जणांना रोजगार मिळेल एवढ्या गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. जालना-अंबड औद्योगिक वसाहतीत तिसºया टप्प्यांत दोन स्टील कंपन्या प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणे शक्य होणार आहे. सिद्धीविनायक स्टील १३१ कोटी, यथार्थ स्टील २२ कोटी, तर शाश्वती पॉवर ही कंपनी जालन्यात १३०० कोटींची गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करणार आहे. जालन्यात सर्व मिळून १४५१ कोटींची गुंतवणूक होण्याचा दावा केला जात आहे.
प्रादेशिक अधिकाºयांचा दावा
एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ यांनी सांगितले, १५० उद्योगांसोबत आजवर करार झाले आहेत. डीएमआयसीमध्ये २५ करार झाले आहेत. हमदर्द, पॅरासन, बीकेटी, सीटीआर सोबतच जालन्यातील स्टील उद्योगांची मोठी गुंतवणूक होत आहे. ३१०० रोजगार निर्मितीचे हे प्रकल्प आहेत. २ लाख ४६ हजार चौ.मी. जागा या उद्योगांना दिली आहे. लातूरमध्ये १३९ हेक्टर जागा अतिरिक्त एमआयडीसीमध्ये रेल्वे कोच निर्मितीच्या उद्योगासाठी दिली आहे. १८ ते २३ फेबु्रवारीदरम्यान मुंबईत होणाºया मॅग्नेटिक महाराष्ट्र या इंटरनॅशनल उद्योग प्रदर्शनात डीएमआयसी, एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात उद्योग यावेत, यासाठी मार्केटिंग होणार आहे. त्याचा लाभ मराठवाड्याला होईल.

Web Title: An investment of Rs. 3,000 crores in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.