Aurangabad Violence : विशेष तपास पथकाकडून चौकशीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:31 AM2018-05-16T01:31:17+5:302018-05-16T12:09:10+5:30

शहरातील काही भागांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठित करण्यात आले आहे.

The investigation started by Special Investigation Team | Aurangabad Violence : विशेष तपास पथकाकडून चौकशीला सुरुवात

Aurangabad Violence : विशेष तपास पथकाकडून चौकशीला सुरुवात

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील काही भागांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाने कामाला सुरुवात केली असून, नागरिकांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले आहे. दंगलीतील दोन जणांना अटक करून तीन दिवस पोलीस कोठडीत अधिकची विचारपूस केली जाणार आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठित केले आहे. या पथकात सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण, पोलीस निरीक्षक सुरेश वानखेडे, नाथा जाधव, अविनाश आघाव, श्रीकांत नवले, सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, अजबसिंग जारवाल, विजय घोरडे, पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर, योगेश धोंडे यांचा समावेश राहणार आहे. पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे हेही पथकाला सहकार्य करीत आहेत.

शुक्रवारी औरंगाबादेत किरकोळ कारणावरून दंगल होऊन शेकडो वाहने, अनेक दुकाने जाळली. यामध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले. पथकाने सोमवारपासूनच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. घटनास्थळावर जाऊन दंगलीशी संबंधित
विविध पुरावे गोळा केले जात आहेत.

नागरिकांकडे असलेले मोबाईल शूटिंग, सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात येत आहे, तसेच घटनास्थळावर पडलेल्या रॉकेलच्या बाटल्या, दगड, पेट्रोलने भरलेल्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने लोकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.

मोबाईल कॅमेरेच तपासाचा केंद्रबिंदू
शुक्रवारी रात्री शहरात उसळलेल्या दंगलीचे मोबाईल कॅमेऱ्यामध्ये असंख्य नागरिकांनी चित्रीकरण केले. नागरिकांनी केलेले चित्रीकरणच पोलीस तपासासाठी उपयुक्त ठरत आहे. या आधारावरच पोलिसांनी तपासाची पुढील दिशा ठरविण्यास सुरुवात केली असून, दंगलीशी संबंधित अनेक पुरावे जमा करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमे-याद्वारे चित्रीकरण केले होते त्याचे व्हिडिओच सोशल मीडियावर अपलोड केले. मंगळवारी दिवसभर शहरात व्हिडिओची देवाण-घेवाण सुरू होती. स्मार्ट सिटींतर्गंत शहरात तब्बल १८०० सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. हे काम मागील एक ते दीड वर्षापासून रखडले

Web Title: The investigation started by Special Investigation Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.