बालरुग्णालयात केवळ १६ इन्क्युबेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:04 AM2017-09-09T01:04:11+5:302017-09-09T01:04:11+5:30

शहरातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात केवळ १६ इन्क्युबेटर असून त्यामुळे एका वार्मरमध्ये दोन शिशुंना ठेवावे लागत आहे

In the hospital, only 16 incubators | बालरुग्णालयात केवळ १६ इन्क्युबेटर

बालरुग्णालयात केवळ १६ इन्क्युबेटर

googlenewsNext

बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात केवळ १६ इन्क्युबेटर असून त्यामुळे एका वार्मरमध्ये दोन शिशुंना ठेवावे लागत आहे. राज्यभरातील जिल्हा रुग्णालयांमधील नवजात शिशु व अतिदक्षता विभागातील इन्क्युबेटरचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असताना ही बाब समोर आली आहे.
महिला व बाल रुग्णालयात जिल्हाभरातून प्रसुतीसाठी येणाºया महिलांची संख्या मोठी आहे. सध्या साठ खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयामध्ये महिन्याकाठी ६२५ ते ६५० प्रसुती होतात. खाटांची संख्या कमी असल्यामुळे प्रसुतीसाठी येणाºया महिलांची गैरसोय होते. रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात वर्षाकाठी ८०० ते एक हजार नवजात बालकांना उपचारासाठी दाखल केले जाते. महिन्याला सरासरी २५ ते ३० नवजात बालके या कक्षात उपचार घेतात. परंतु, स्त्री रुग्णालयतील नवजात शिशू कक्षात केवळ १६ इन्क्युबेटर असून ही संख्या अपुरी आहे. यातील आठ इन्क्युबेटर रुग्णालयात जन्मलेल्या शिशंूची तर उर्वरित इन्क्युबेटरध्ये बाहेरहून आलेल्या शिशूंना ठेवण्यात येते.
नवजात शिशू कक्षात आॅक्सिजन व अन्य आवश्यक सोयी सुविधांचा तुटवडा नसला तरी कधी-कधी एका इन्क्युबेटरमध्ये दोन बालकांना ठेवावे लागते. एक किलो किंवा त्यापेक्षा कमी वजनाच्या बाळांना अनेकदा एका महिन्याहून अधिक काळ उपचारासाठी नवजात कक्षात ठेवावे लागते. इन्क्युबेटरच्या अपुºया संख्येमुळे अनेकदा गैरसोय होते. शिवाय जंतसंसर्ग होण्याची भीतीही असते. त्यामुळे जिल्हा महिला व बाल रुग्णालयात इन्क्युबेटरची संख्या वाढविण्याची गरज आहे.

Web Title: In the hospital, only 16 incubators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.