मनपाचा अतिक्रमणावर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:02 AM2017-11-17T01:02:34+5:302017-11-17T01:02:56+5:30

नांदेड : जुन्या नांदेडातील किल्ला ते दरबार मशिद या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी महापालिकेने गुरूवारी अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली़ या रस्त्यावरील ८ मालमत्तापैकी ५ मालमत्ता पाडण्यात आल्या़ यावेळी स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला़ मात्र पोलीस बंदोबस्त मोठा असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही़

Hammer on the encroachment of the municipality | मनपाचा अतिक्रमणावर हातोडा

मनपाचा अतिक्रमणावर हातोडा

googlenewsNext
ठळक मुद्देमोठा पोलीस बंदोबस्त : ४ मालमत्ता जेसीबीने जमिनदोस्त; रस्तारुंदीकरणाचा मार्ग मोकळा

नांदेड : जुन्या नांदेडातील किल्ला ते दरबार मशिद या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी महापालिकेने गुरूवारी अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली़ या रस्त्यावरील ८ मालमत्तापैकी ५ मालमत्ता पाडण्यात आल्या़ यावेळी स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला़ मात्र पोलीस बंदोबस्त मोठा असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही़
जेएनएनयुआरएम अंतर्गत किल्ला ते दरबार मशिद हा रस्ता क्रमांक ८ च्या रूंदीकरणासाठी अतिक्रमणाची अडचण निर्माण झाली होती़ दरम्यान, महापालिकेने या जागेपोटी १ कोटी ६६ लाख रूपये मावेजा उपजिल्हाधिकारी, भूसंपादन विभागाकडे जमा केला होता़ त्यानंतर संबंधित विभागाकडून या जागेचा ताबा ३० आॅक्टोबर रोजी महापालिकेला देण्यात आला होता़ त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमण पाडण्याचा मार्ग मोकळा झाला होता़ या रस्त्याची मंजुरी २०१३ मध्ये मिळाली होती़ त्यावेळी या रस्त्यावर ३५ मालमत्ता होत्या़ त्यातील २७ मालमत्ताधारकांनी निकषानुसार मावेजा घेवून मार्ग मोकळा केला होता़ मात्र ८ मालमत्ताधारकांनी जुन्या रेट नुसार मावेजा घेण्यास विरोध दर्शवून त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली़ परंतु न्यायालयात महापालिकेच्या बाजुने निकाल लागला़ या अतिक्रमणधारकांमध्ये रफत हुसैन अन्सारी, शेख सालम शेख बावजीर, अमिरबीन अजान, शेख मुनीर शेख मदार, अमीजोद्दीन मोईनोद्दीन, महमंद बासीद अब्दुल हफीज, सयद खलील उल्ला हुसेनी, शेख मुनीर शेख मदार बागवान यांचा समावेश आहे़
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून १६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता या रस्त्यावरील अतिक्रमण पाडण्यास सुरूवात केली़ मालमत्ता पाडण्याचे काम सुरू असताना काही नागरिकांनी विरोध दर्शविला़ मात्र पोलिस बंदोबस्त मोठा असल्याने स्थानिक नागरिकांचा विरोध मावळला़
त्यामुळे गुरूवारी सायंकाळपर्यंत ४ मालमत्ता पाडण्यात आल्या़ उर्वरित मालमत्ता पाडण्याचे काम शुक्रवारी करण्यात येणार आहे़ अतिक्रमण हटाव कार्यवाही वेळी सहायक आयुक्त प्रकाश येवले,सहायक आयुक्त गुलाम सादेक, कार्यकारी अभियंता प्रकाश कांबळे, क्षेत्रीय अधिकारी मिर्झा बेग, संजय कांबळे, स्टेडियम व्यवस्थापक रमेश चौरे, क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव, जमील अहेमद, अविनाश अटकोरे, रईस पाशा आदी उपस्थित होते़ तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित फस्के, तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार विजयकुमार पाते, मंडळ अधिकारी जोंधळे, पोलिस निरिक्षक अनिल गायकवाड यांच्यासह ८४ पोलिस कर्मचारी घटनास्थळ हजर होते़ अतिक्रमण पाडण्यासाठी २ जेसीबी, १ पोकलेन, २ टिप्पर, ६ ट्रक्टर व ८० मजूर कामावर होते़ सायंकाळी ६ नंतरही मनपाच्या पथकाकडून अतिक्रमण पाडण्याचे काम सुरुच होते़ उशिरापर्यंत पोलिस बंदोबस्तही तैनात होता़

Web Title: Hammer on the encroachment of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.