ग्रामसेवकाला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:46 AM2017-08-20T00:46:21+5:302017-08-20T00:46:21+5:30

:वडीलोपार्जित प्लॉट फेरफार करुन नावावर करुन देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्विकारणाºया हिमायतनगर तालुक्यातील कार्ला येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले़

Gramsevak caught | ग्रामसेवकाला पकडले

ग्रामसेवकाला पकडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड:वडीलोपार्जित प्लॉट फेरफार करुन नावावर करुन देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्विकारणाºया हिमायतनगर तालुक्यातील कार्ला येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले़
तक्रारदाराची हिमायतनगर तालुक्यातील मौजे कार्ला येथील वडीलोपार्जित प्लॉटचा फेरफार करुन नमुना नंबर आठवर तक्रारदार यांच्या नावाची नोंद करण्यासाठी ग्रामसेवक बाबूराव राजाराम तावडे यांनी १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाशी संपर्क साधून तक्रार दिली़ १८ आॅगस्ट रोजी हदगांव येथे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, ग्रामसेवकाने बारा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले़ त्यानंतर १९ आॅगस्ट रोजी हिमायतनगर येथील रहिम कॉलनी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचला़ यावेळी ग्रामसेवक बाबूराव तावडे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली़ त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले़ याप्रकरणी बाबूराव तावडे यांच्या विरोधात हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या कारवाईत पोलिस अधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक बी़एल़पेडगांवकर, कपील शेळके, पोना़साजीद अली, बाबू गाजुलवार, एकनाथ गंगातीर्थ, नरेंद्र बोडके यांचा समावेश होता़

Web Title: Gramsevak caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.