एक हजार रुपये द्या अन् शहरात प्रवेश करा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:23 AM2017-10-20T00:23:45+5:302017-10-20T00:23:45+5:30

दूरवरून जाण्याऐवजी बीड शहरातून जायचे असेल तर एक हजार रुपये द्या अन् शहरात प्रवेश करा, असा अनोखा फंडा महामार्ग पोलिसांकडून सध्या राबविला जात आहे.

Give one thousand rupees and enter the city ...! | एक हजार रुपये द्या अन् शहरात प्रवेश करा...!

एक हजार रुपये द्या अन् शहरात प्रवेश करा...!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दूरवरून जाण्याऐवजी बीड शहरातून जायचे असेल तर एक हजार रुपये द्या अन् शहरात प्रवेश करा, असा अनोखा फंडा महामार्ग पोलिसांकडून सध्या राबविला जात आहे. आपली दिवाळी गोड साजरी करण्यासाठी ट्रकचालकांची आर्थिक लूट केली जात आहे. याचा फटका शहरवासियांना सहन करावा लागत आहे.
सोमवारी सायंकाळी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक शाखेच्या एका महिला कर्मचा-यास ट्रकचालकाने शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हा ट्रक मुख्यालयात जमा केला. ही घटना केवळ महामार्ग पोलिसांच्या दिवाळीतील गोडधोड ‘वसुली’मुळेच घडली. वास्तविक पाहता शहरातील बिंदुसरा नदीवरील पूल अवजड वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे अवजड वाहतूक ही गढी व मांजरसुंबा मार्गे वळविण्यात आली आहे. तसेच काही वाहने महामार्गावरील वळणरस्त्यावरील जातात; परंतु सोमवारी सायंकाळी शहरात आलाच कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासाठी केवळ महामार्ग पोलीस जबाबदार असल्याचा आरोप सर्वसामान्यांतून होत आहे.
दरम्यान, काही महिन्यांपासून बीड शहरातील वाहतूक बंद झाल्यामुळे महामार्ग पोलिसांची जोरात ‘दिवाळी’ सुरू आहे. रात्री व भल्या पहाटे महामार्गावर ट्रक अडवून त्यांच्याकडून खुलेआम कारवाईच्या नावाखाली वसुली केली जात आहे. ज्या ट्रकचालकांजवळ नियमानुसार कागदपत्रे आहेत, त्यांना वेगवेगळ्या त्रुटींच्या नावाखाली कारवाईची भीती दाखविली जात आहे. त्यांना शहर प्रवेशास बंदी करून गढी अथवा मांजरसुंबा मार्गे दूरचा मार्ग अवलंबिण्यास भाग पाडले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Give one thousand rupees and enter the city ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.