चिकलठाण्यातच कचरा प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:51 PM2018-03-29T23:51:04+5:302018-03-29T23:53:14+5:30

सर्वाेच्च न्यायालयाने शहरातील कचरा डेपो प्रकरणात शासनाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीवर जबाबदारी सोपविल्यानंतर समितीने आज तीन तास बैठक घेतली. नारेगाव येथील कचरा डेपोला फाटा देऊन चिकलठाणा परिसरातील दुग्धनगरीसाठी आरक्षित असलेल्या ३५ एकर जागेत कायमस्वरुपी मध्यवर्ती कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.

Garbage Process | चिकलठाण्यातच कचरा प्रक्रिया

चिकलठाण्यातच कचरा प्रक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्देनारेगावचा विचार नाही : समितीच्या बैठकीत निर्णय; विरोध करणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सर्वाेच्च न्यायालयाने शहरातील कचरा डेपो प्रकरणात शासनाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीवर जबाबदारी सोपविल्यानंतर समितीने आज तीन तास बैठक घेतली. नारेगाव येथील कचरा डेपोला फाटा देऊन चिकलठाणा परिसरातील दुग्धनगरीसाठी आरक्षित असलेल्या ३५ एकर जागेत कायमस्वरुपी मध्यवर्ती कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.
चिकलठाण्यातील गट नं.२३१ मधील पालिकेच्या मालकीच्या ३५ पैकी ५ एकर जागेत ओला व २ एकर जागेत सुका कचरा, असे वर्गीकरण करण्यासाठी तातडीने शेड बांधण्यात येणार आहे. सध्या तेथे पूर्ण शहराचा कचरा प्रक्रियेसाठी येणार नाही. ज्या झोनमध्ये कचरा वर्गीकरण, कम्पोस्टिंगसाठी जागा नाही, तेथीलच कचरा याठिकाणी येणार आहे. ९१ वॉर्डातील कचºयाचे वर्गीकरण होऊन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा आहे.
उर्वरित २४ वॉर्डांतील कचºयाचे वर्गीकरण व प्रक्रिया दुग्धनगरीतील ५ एकर जागेत शुक्रवारपासून करण्यात येणार आहे. त्यासाठी शेडस् उभारणीचे काम सुरू करण्याचे आदेश समितीने पालिकेला दिले. उर्वरित ३० एकर जागेत डीपीआरनुसार मध्यवर्ती कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन पालिकेने करावे, असे समितीने सुचविले आहे. चिकलठाणा येथील जागा पालिकेच्या मालकीची असून, तेथे विरोध करण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी पोलीस बळाचादेखील वापर करण्यात येईल, असा इशाराही समितीने दिला आहे.
गुरुवारी दुपारी विभागीय आयुक्तालयात आयुक्त तथा समितीचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम, शहर अभियंता एस. डी. पानझडे, एमपीसीबीचे अधिकारी कदम, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, अफसर सिद्दीकी यांच्या उपस्थितीत बुधवारी सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर पुढील उपाययोजनांसाठी बैठक झाली.
४१ दिवसांपासून शहरातील कचरा प्रकरण राज्यभर गाजत असून, आजवर विविध उपाययोजना झाल्या तरीही कचºयाच्या प्रक्रियेसाठी जागा उपलब्ध नव्हती.
जागा शोधण्यात पालिकेला, जिल्हाधिकाºयांना यश आले असून, तेथे मध्यवर्ती कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची घोषणा प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी केली. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार केला जाणार आहे. शहरातील कचरा आणि मध्यवर्ती कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत प्रदूषण मंडळाने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ समितीसमोर गुरुवारी सादर केला.
जिल्हाधिकारी म्हणाले, कायमस्वरुपी प्रश्न सुटावा
समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, नारेगाव-मांडकी येथे कचरा टाकण्याचा पर्याय समितीवर खुला आहे. परंतु पुन्हा तीन महिन्यांनी कचरा प्रकरण डोके वर काढील. कायमस्वरुपी हा प्रश्न मिटावा, यासाठीच चिकलठाणा येथील दुग्धनगरीसाठी आरक्षित असलेली जागा मध्यवर्ती कचरा प्रकल्पासाठी निश्चित केली आहे.
दुग्धनगरीसाठी भविष्यात जागा घेता येईल; परंतु सध्या कचºयाचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. जागेच्या वापराचा उद्देश तातडीने बदलण्यात येईल. नारेगाव येथील कचरा डेपो वर्षभरात स्वच्छ होईल. तसेच चिकलठाण्यात आधी प्रकल्प उभारला जाईल. त्यानंतर प्रक्रियेसाठी वर्गीकरण केलेला कचरा पाठविला जाईल. विमानतळ परिसरात डम्प्ािंगसाठी बंदी आहे. प्रक्रिया प्रकल्पाला परवानगी आहे. शुक्रवारपासून चिकलठाण्यातील जागेवर कामाला सुरुवात होणार आहे. विरोध करणाºयांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.
आयुक्त म्हणाले...
कचरा निर्मूलन समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर म्हणाले, सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे वाचन केले. त्या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाने टाईमटेबल तयार केला आहे. मनपाने सध्या सुरू केलेले काम चालूच राहील. ज्या झोनमध्ये जागा नाही, तेथील कचºयाचे वर्गीकरण करून तो चिकलठाण्यातील गट नं.२३१ मधील जागेत पाठविण्यात येईल. ३ महिन्यांत समिती काय करणार आहे, त्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला असून, तो न्यायालयात सादर करण्यात येईल.

Web Title: Garbage Process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.