दुचाकीस्वारांना लुटणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:51 PM2017-10-04T23:51:16+5:302017-10-04T23:51:16+5:30

दुचाकीवरुन जाणाºयाला एकटे गाठून चाकूचा धाक दाखवित लुटणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे़ त्यांच्याकडून ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़

A gang of two-wheelers looted the police | दुचाकीस्वारांना लुटणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

दुचाकीस्वारांना लुटणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : दुचाकीवरुन जाणाºयाला एकटे गाठून चाकूचा धाक दाखवित लुटणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे़ त्यांच्याकडून ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़
११ सप्टेंबर रोजी लोहा तालुक्यातील कलंबर येथील शिवपाल मन्नूसिंह ठाकूर हे मित्रासोबत नांदेडहून कलंबरला जात होते़ रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी अडविले़
अमच्या अंगावर का थुंकलास असे म्हणून चाकूचा धाक दाखवित ठाकूर व त्यांच्या मित्राला मारहाण केली़ तसेच त्यांच्याजवळील १२ हजार ५०० रुपयांचा मोबाईल लंपास केला़ याप्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़
या प्रकरणात सपोनि पांडुरंग भारती यांच्या नेतृत्वाखाली पथकाची स्थापना करण्यात आली होती़ खबºयाकडून मिळालेल्या माहितीवरुन, पोलिसांनी नांदेड शहरातील दत्तनगर भागात राहणाºया नागराज चव्हाण याला पकडले़ त्यानंतर त्याच्या इतर साथीदारांना पकडण्यात आले़
आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली दिली़ तसेच मंगरुळघाट, माळाकोळी, सिडको, पूर्णा रोड, मालेगांव रोड, वसमत-मालेगाव रोड, भोकर फाटा, बारडरोड, नर्सी-नायगाव आदी ठिकाणी अशाच पद्धतीने दुचाकीस्वारांना लुटल्याचे सांगितले़ त्यांनी दाखविलेल्या घटनास्थळावर पाहणीही करण्यात आली़ पोलिसांनी त्यांच्याकडून २० हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, एक खंजीर असा एकूण ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला़
पोलिसांच्या या पथकात सपोनि भारती, पोहेकॉ़ दत्ता वाणी, राजू पांगरेकर, तानाजी येळगे, शेख जावेद, शेख रहेमान, मनोज परदेशी, दादाराव मेश्रामे, बिडगर यांचा समावेश होता़

Web Title: A gang of two-wheelers looted the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.