रुग्ण मुलीचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:04 AM2018-05-19T01:04:06+5:302018-05-19T01:04:27+5:30

पाचोड (जि. औरंगाबाद) : अल्पवयीन रुग्ण मुलीचा विनयभंग करणाºया खाजगी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पैठण तालुक्यातील नांदर गावात घडली. पीडित मुलीचे नातेवाईक पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेल्याने त्या भीतीपोटीच या डॉक्टरने जगाचा निरोप घेतला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. डॉ. विजय गिरी असे या मयत डॉक्टरचे नाव आहे.

 The doctor, who was molested by a patient, committed suicide | रुग्ण मुलीचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरची आत्महत्या

रुग्ण मुलीचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरची आत्महत्या

googlenewsNext

पाचोड (जि. औरंगाबाद) : अल्पवयीन रुग्ण मुलीचा विनयभंग करणाºया खाजगी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पैठण तालुक्यातील नांदर गावात घडली. पीडित मुलीचे नातेवाईक पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेल्याने त्या भीतीपोटीच या डॉक्टरने जगाचा निरोप घेतला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. डॉ. विजय गिरी असे या मयत डॉक्टरचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, पाचोडची रहिवासी असलेली एक १५ वर्षीय मुलगी आजीचे निधन झाल्याने आई-वडिलांसह नांदर येथे अस्थि विसर्जनासाठी गेली होती. गुरुवारी सायंकाळी पोट दुखत असल्याने ही मुलगी नांदर येथील डॉ. गिरी यांच्या दवाखान्यात नातेवाईकांसोबत गेली. यावेळी डॉ. गिरी याने तिचा तपासणी करताना विनयभंग केला. ही बाब पीडित मुलीने दवाखान्याबाहेर आल्यावर नातेवाईकांना सांगितली. यावर जाब विचारण्यासाठी नातेवाईक दवाखान्यात गेले असता तेथे डॉक्टर नव्हते. नातेवाईकांनी नंतर डॉक्टरचे घर गाठले, पण आतून घर बंद असल्याने नातेवाईकांनी सरळ पाचोड पोलीस ठाणे गाठून डॉक्टरविरुद्ध तक्रार दिली. ही माहिती डॉक्टरला कळताच त्याने राहत्या घरात पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सपोनि. महेश आंधळे, उपनिरीक्षक गोरक्ष खरड, जमादार निवृत्ती मदने, शिवानंद बनगे, चरण सुलाने, नरेंद्र अंधारे, जीवन गुढेकर व महिला पोलीस कर्मचारी तनुजा गोपालघरे यांनी घटनास्थळी भेट दिली. आंधळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ही माहिती वरिष्ठांना दिली. महिला तक्रार समितीला पोलीस ठाण्यात बोलावून पीडित मुलीची इनकॅमेरा चौकशी करून जवाब घेण्यात आले. यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूसह डॉ. गिरीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
यापूर्वीही डॉक्टरवर दोन गुन्हे दाखल
यापूर्वीही डॉ. गिरीविरुद्ध विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल असल्याचे पाचोड पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणला असता मयत डॉक्टरच्या नातेवाईकांनीही जोपर्यंत दोषींवर कारवाई करीत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. यावर सपोनि. महेश आंधळे यांनी सर्वांची समजूत काढून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केला.

Web Title:  The doctor, who was molested by a patient, committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस