दिव्यांग म्हणतो, न्याय द्या किंवा आत्मदहनाची परवानगी द्या

By Admin | Published: June 24, 2017 12:12 AM2017-06-24T00:12:20+5:302017-06-24T00:16:30+5:30

लोहा : दिव्यांगाने न्याय द्यावा, अन्यथा आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी असे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले़

Divyang says, allow justice or self-realization | दिव्यांग म्हणतो, न्याय द्या किंवा आत्मदहनाची परवानगी द्या

दिव्यांग म्हणतो, न्याय द्या किंवा आत्मदहनाची परवानगी द्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
लोहा : रिसनगाव ता़लोहा येथील दिव्यांगाने व्यवसायासाठी जागेची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला़ मात्र प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने न्याय द्यावा, अन्यथा आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी असे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले़
संतोष देवराव पवार असे दिव्यांगाचे नाव आहे़ वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन मुलींच्या पालणपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे़ ६३ टक्के दिव्यांग संतोष यांनी बसस्थानकासमोरील एका दुकानाच्या पायरीखालील जागेत भाड्याने पानटपरी सुरू केली़ या माध्यमातून कुटुंबाचा भार, जागेचे भाडे भरणे कठीण झाले़ त्यामुळे ३ टक्के निधी मिळावा म्हणून त्यांनी पाठपुरावा केला़ मात्र प्रशासनाने लक्ष दिले नाही़

Web Title: Divyang says, allow justice or self-realization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.