पर्यटन स्थळांचा ‘डिजिटल प्रेझेन्स’ही महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:38 PM2018-09-26T23:38:40+5:302018-09-26T23:39:14+5:30

अजिंठा, वेरूळ लेणी, बीबी-का-मकबरा, पाणचक्की, प्राचीन दरवाजे अशा ऐतिहासिक स्थळांनी नटलेली औरंगाबाद नगरी पर्यटनाच्या बाबतीत थेट जगाच्या नकाशावर आलेली आहे; परंतु काळानुसार स्वत:मध्ये बदल करीत पर्यटक ांच्या अपेक्षेनुसार या शहरात काही भौतिक सुविधा उपलब्ध होऊन पर्यटन स्थळांचा ‘डिजिटल प्रेझेंन्स’ वाढणेही आवश्यक असल्याचे मत पर्यटन व्यावसायिकांनी तसेच शहरातील पर्यटनप्रेमींनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त व्यक्त केले.

 The 'Digital Precense' of tourist destinations is also important | पर्यटन स्थळांचा ‘डिजिटल प्रेझेन्स’ही महत्त्वाचा

पर्यटन स्थळांचा ‘डिजिटल प्रेझेन्स’ही महत्त्वाचा

googlenewsNext
ठळक मुद्देजागतिक पर्यटन दिन : पर्यटकांच्या गरजेनुसार शहरात भौतिक सुधारणा आवश्यक

रुचिका पालोदकर
औरंगाबाद : अजिंठा, वेरूळ लेणी, बीबी-का-मकबरा, पाणचक्की, प्राचीन दरवाजे अशा ऐतिहासिक स्थळांनी नटलेली औरंगाबाद नगरी पर्यटनाच्या बाबतीत थेट जगाच्या नकाशावर आलेली आहे; परंतु काळानुसार स्वत:मध्ये बदल करीत पर्यटक ांच्या अपेक्षेनुसार या शहरात काही भौतिक सुविधा उपलब्ध होऊन पर्यटन स्थळांचा ‘डिजिटल प्रेझेंन्स’ वाढणेही आवश्यक असल्याचे मत पर्यटन व्यावसायिकांनी तसेच शहरातील पर्यटनप्रेमींनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त व्यक्त केले.
सध्या अनेक व्यवसाय हे आॅनलाईन पद्धतीने उपलब्ध आहेत. आजच्या तरुणांपर्यंत आणि जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीपर्यंत क्षणार्धात पोहोचायचे असेल, तर आपला किंवा आपल्या उद्योगाचा ‘डिजिटल प्रेझेन्स’ असणे अत्यंत आवश्यक आहे. भरघोस उत्पन्न आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणाºया पर्यटन व्यवसायानेही डिजिटल युगाची पावले ओळखत कात टाकणे गरजेचे झाले आहे. त्यामुळेच २०१८ च्या पर्यटन दिनासाठी खास ‘पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.
जागतिक ख्यातीची पर्यटनस्थळे शहरात असूनही या स्थळांचा डिजिटल माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्यात पर्यटन मंडळ कमी पडत असल्याचे दिसून येते. या मंडळाचा ‘डिजिटल प्रेझेन्स’ केवळ नावालाच असून ‘अपडेट’ राहणे आणि पर्यटन स्थळांचे ‘डिजिटल मार्के टिंग’ करून अधिकाधिक पर्यटक ांना शहराकडे आकर्षित करण्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मागे पडते आहे. एमटीडीसीची वेबसाईट पुस्तकी स्वरूपातील असून, त्यावर पर्यटन स्थळांची सर्व माहिती उपलब्ध तर आहे. मात्र, सध्याच्या काळानुसार पर्यटनस्थळी असणारे तिकिटांचे दर, तिकि टांचे आॅनलाईन बुकिंग या सर्व सुविधांचा येथे अभाव आहे. येथील दूरध्वनी क्रमांकही जुने असून ते बदलणेही आवश्यक आहे. या गोष्टीमुळे पर्यटक इतर संकेतस्थळांना भेटी देतात. प्रत्येक संकेत स्थळावर वेगवेगळी माहिती उपलब्ध असल्यामुळे कोणती माहिती ग्राह्य धरावी, याबाबत पर्यटकांमध्ये संभ्रम निर्माण होतो.
पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचे अभ्यासपूर्ण लेखन (ब्लॉग), पर्यटन स्थळांसंबंधीचे वृत्त, या क्षेत्रात होणारे बदल या सर्व गोष्टी वारंवार संकेतस्थळावर टाकाव्यात, तसेच फे सबुक पेज, टिष्ट्वटर या माध्यमातूनही पर्यटन स्थळांचा अधिकाधिक प्रचार करावा, असे काही बदल पर्यटनप्रेमींनी सुचविले.
चौकट :
- परदेशी पर्यटकांनी दिवसभर पर्यटन केल्यानंतर त्यांना सायंकाळच्या वेळी त्यांच्या पद्धतीनुसार मनोरंजनासाठी शहरात काही सुविधा उपलब्ध असणेही बदलत्या काळानुसार गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या लोककलांविषयी माहिती देणाºया सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण, नाईट क्लब, खास परदेशी नागरिकांच्या पद्धतीनुसार उभी करण्यात आलेली रेस्टॉरंटस् या सर्व गोष्टी शहरात सुरू झाल्यास त्याचा पर्यटनावर निश्चितच सकारात्मक परिणाम होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
- पर्यटकांच्या दृष्टीने शहरात उत्कृष्ट बाजारपेठ निर्माण होणेही आवश्यक आहे. याच धर्तीवर अवाढव्य खर्च करून कलाग्रामचा पांढरा हत्ती उभारण्यात आला; परंतु चुकीची जागा निवडल्यामुळे आणि अन्य काही कारणांमुळे थोड्या दिवसात तेथील ‘कला’ लोप पावली असून केवळ ‘ग्राम’ उरले आहे.
चौकट :
रस्ते आणि कचरा हे मुख्य अडसर-
डिजिटल प्रेझेन्ससोबतच शहरात भौतिक सुविधांचा अभाव दिसून येतो. येथील रस्ते आणि कचरा या दोन गोष्टी प्रामुख्याने अडसर ठरत आहेत. रस्ते दुरुस्ती हे प्रशासनाचे काम असले तरी कचºयासाठी मात्र सामान्य नागरिकांनीही पुढाकार घ्यायला हवा. परदेशी नागरिकांना आपल्या शहरात स्वच्छ वाटावे म्हणून मनपाच्या बरोबरीने नागरिकांनी प्रयत्न केल्यास ही एक मोठी देशसेवा होईल.
- जसवंतसिंग
सहल आयोजक

Web Title:  The 'Digital Precense' of tourist destinations is also important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.