‘जय मल्हार’च्या घोषणेने जिल्हा दणाणला

By Admin | Published: July 30, 2014 11:49 PM2014-07-30T23:49:05+5:302014-07-31T00:47:54+5:30

नांदेड : ‘यळकोट..यळकोट..जय मल्हार’सारख्या विविध घोषणांनी जिल्ह्यातील कंधार, माहूर, बिलोली, मुखेड, भोकर, हदगाव आणि किनवट परिसर दणाणला.

With the declaration of 'Jai Malhar' the district sadar | ‘जय मल्हार’च्या घोषणेने जिल्हा दणाणला

‘जय मल्हार’च्या घोषणेने जिल्हा दणाणला

googlenewsNext

नांदेड : ‘यळकोट..यळकोट..जय मल्हार’सारख्या विविध घोषणांनी जिल्ह्यातील कंधार, माहूर, बिलोली, मुखेड, भोकर, हदगाव आणि किनवट परिसर दणाणला. धनगर समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार मोर्चा काढले. मोर्चाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला.
चांगला प्रतिसाद
भोकर : धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करुन प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने भोकर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हरीदत्त हाके, नागोराव शेंडगे, सुभाष नाईक, व्यंकटराव वाडेर, गंगाधर थोंबे, भगवान नाईक यासह शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
अनेकांची उपस्थिती
श्रीक्षेत्र माहूर : माहूर येथील मोर्चात तानाजी मनभे, विकास गावंडे, भारत गावंडे, मारोतराव हुंबे, सत्यम हाके, अनिल वाघमारे, नीळकंठ मस्के, आनंदा हिंगाडे, धोंडेराव मार्कंड, साहेबराव पांढरे, बाळू हुलकाणे आदी सहभागी झाले होते़
५ हजार समाजबांधव
बिलोली : बिलोली येथील मोर्चात ५ हजारांपेक्षा अधिक मोर्चेकरी सहभागी झाले होते़ यामुळे नांदेड-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली़ दुपारी १२ वाजता बिलोली तहसील कार्यालयावर मोर्चा निघाला़ मोर्चात समाजबांधवांनी मेंढ्याही आणल्या होत्या़ मोर्चात माजी पं़स़ सदस्य शंकरराव काळे, पं़स़ सदस्य शंकरराव परसुरे, आदमपूरचे सरपंच प्रभाकर पेंटे, श्यामराव मजगे, लक्ष्मणराव होरके, गंगाधर प्यादेकर, अंबादास शिरगिरे, नागेश प्यादेकर, वैभव खांडेकर, रमेश श्रीगिरे, चंद्रकांतराव देवारे, सरपंच सुनीता होरके, मल्लू धुळेकर, शशिकला खांडेकर, उपसरपंच रामराव तुकडे, शंकरराव रामलोड, भाऊराव आवळे, धोंडिबा श्रीगिरे, कोंडिबा आरळीकर, मारोती अहिरे, बापूराव डोणगावे, विश्वनाथ आब्दगिरे, शिवकांता मैलारे आदी सहभागी झाले होते़ जिल्हाध्यक्ष यशपाल भिंगे, अ‍ॅडक़ोकणे, काळे, पेंटे यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले़
नायगावात प्रतिसाद
नायगाव बाजार : येथील मोर्चासाठी माणिक लोहगावे, सूर्याजी चाडकर, बालाजी चोडे, नागोराव लव्हाळे, व्यंकटराव कोकणे, बालाजी पेटेकर, प्रशांत कोकणे, भगवान भिंगे, बालाजी नारे, डोणगावे यांनी परिश्रम घेतले़
हदगाव दणाणले
हदगाव: गळ्यात पिवळ्या दस्त्या टाकून जय मल्हार, येळकोट येळकोटच्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी डॉ. निळे जि.प. सदस्य संभाजी हुलकाने, हाराळे, बाबूराव देशमुखे, बालासाहेब मस्के, कैलासराव मस्के, प्रेमकुमार मस्के उपस्थित होते.
धर्माबाद: येथील मोर्चात धनगर समाजाचे तालुकाध्यक्ष गोविंद पाटील सोनटक्के, प्रा. अ‍ॅड. वसंत खानापूरकर, प्रा. श्रीगिरे, नगरसेवक विरप्पा मदनूरकर, पिराजी उरेकर, मारोती डेबेकर, एकनाथ जिंकले, बाबूराव चिंचोलीकर आदींसह शेकडो समाजबांधव होते.
तहसीलदारांना निवेदन
मुखेड : मागण्यांचे निवेदन तहसीलदार एस़पी़ घोळवे यांंना देण्यात आले़ यावेळी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मंडलापूरकर, शिवसेनेचे नेते जगन्नाथ कामजे, व्यंकटराव पाटील, गोविंद खांडेकर, अशोक पाटील रावीकर, कल्याण पाटील अखरगेकर, संगमेश्वर देवकत्ते, व्यंकट
दबडे, शिवलींग नाईक, रावसाहेब पाटील माकणीकर, बलभीम शेंडगे, व्यंकटराव नाईक, प्रा़आऱडी़ पाटील, प्रा़ बोरगावकर, बाबु नाईक, बालाजी नाईक कलंबरकर, व्यंकटराव पाटील हाळणीकर, धनराज नाईक, व्यंकटराव पाटील बेनाळकर, विठ्ठलराव नाईक, अनिल नाईक, विठ्ठल देवकत्ते, सचिन श्रीरामे, हणमंत वाडीकर, कृष्णा कामजे, गणेश धिरू, मारोती, अमनर, नागोराव पाटील, भीमराव पाटील, राजेंद्र नाईक आदींचा समावेश होता़
वाहनांच्या रांगा
लोहा : येथे मोर्चाचे नेतृत्व जि.प.चे माजी अध्यक्ष संभाजी धुळगंडे, पं.स.सभापती अनुसया वैजाळे, बाजार समितीचे सभापती रुस्तमराव धुळगंडे, डॉ. श्रीरामे आदींनी केले. यावेळी हनुमंत धुळगंडे, मारोती जंगले, कालीिदास फुले आदींचीही उपस्थिती होती. लातूर- नांदेड महामार्गवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या.
तहसीलवर मोर्चा
कंधार: येथील तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार अरुण संगेवार यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. मोर्चाचे नंतर सभेत रुपांतर झाले. आ. शंकरअण्णा धोंडगे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, अ‍ॅड. मुक्तेश्वर धोंडगे, जि. प. सभापती प्रवीण पाटील चिखीकर, लोहा पं. स. सभापती अनुसया वैजाळे, माजी जि. प. सदस्य बालाजी वैजाळे, रामचंद्र येईलवाड आदींनी मागणीस पाठिंबा दिला. मोर्चात जि. प. चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, प्राचार्य डॉ. जी. आर. पगडे, उत्तम कोंडलवाडे, परशुराम वडजे, मधुकर पाये, धोंडिबा भायेगावे, बालाजी झुंबाड, बबन नाईक, व्यंकट काकडे, मारोती कौठेकर, बालाजी गुंडे, प्रा. उत्तम धुमाळ, संजय वागलगावे, भगवान नखाते, प्रा. मुरहारी कुंभारगावे, सतीश देवकते, एस. आर. वडजे, उतम चव्हाण, गंगाप्रसाद यन्नावार, माधव मुसळे, चित्रसेन पाटील, जि. प. सदस्य प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, श्रीराम भायेगावे आदी सहभागी झाले होते.

Web Title: With the declaration of 'Jai Malhar' the district sadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.