विभागीय क्रीडा संकुलातील अस्वच्छतेविषयी झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 11:43 PM2019-01-24T23:43:05+5:302019-01-24T23:43:28+5:30

मुख्यालयातील क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी विभागीय क्रीडा संकुल हा ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा आरसा ठरायला हवा; परंतु येथील त्यांनी अस्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त करताना मैदानावर धूळ उडून त्रास होऊ नये यासाठी त्यावर पिण्यास अयोग्य पाण्याचा वापर आठवड्यातून एकदा करण्याच्या सूचना विभागीय क्रीडा संकुल समितीचे सचिव व क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड व सहसचिव व जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांना केल्या आहेत.

Dangers about uncleanness in the departmental sports complex | विभागीय क्रीडा संकुलातील अस्वच्छतेविषयी झाडाझडती

विभागीय क्रीडा संकुलातील अस्वच्छतेविषयी झाडाझडती

googlenewsNext
ठळक मुद्देक्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी मैदानावर पिण्यास अयोग्य पाण्याचा वापर करण्याच्या दिल्या सूचना

औरंगाबाद : मुख्यालयातील क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी विभागीय क्रीडा संकुल हा ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा आरसा ठरायला हवा; परंतु येथील त्यांनी अस्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त करताना मैदानावर धूळ उडून त्रास होऊ नये यासाठी त्यावर पिण्यास अयोग्य पाण्याचा वापर आठवड्यातून एकदा करण्याच्या सूचना विभागीय क्रीडा संकुल समितीचे सचिव व क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड व सहसचिव व जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांना केल्या आहेत.
विभागीय क्रीडा संकुलातील अस्वच्छता आणि गैरसोयींविषयी अनेक तक्रारी होत आहेत. त्याचे औचित्य साधताना पुणे येथील मुख्यालयातर्फे क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांना विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी करण्यासाठी पाठवण्यात आले
होते.
यावेळी सुधीर मोरे यांनी विभागीय क्रीडा संकुलातील पूर्ण परिसराशिवाय, इनडोअर हॉल, अ‍ॅथलेटिक्सचे मैदान, हॉकी, क्रीडा प्रबोधिनी तसेच खेळाडूंच्या पिण्यासाठीच्या टाकीचीदेखील स्वत: टाकीवर उभा राहून पाहणी केली. यावेळी त्यांना कचऱ्याचे ढिगारे दिसले. त्याचप्रमाणे पावसाळ्यात अ‍ॅथलेटिक्स व फुटबॉल मैदानातील ड्रेनेजमधील अर्धवट काढलेली माती तेथेच टाकल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. इनडोअर हॉलमध्ये १२ बॅडमिंटनचे कोर्ट आहेत. इनडोअर हॉल हा मल्टीपर्पज हॉल आहे आणि बॅडमिंटन कोर्टसाठी जास्त जागा आहे त्याचे नियोजन करून अन्य खेळही तेथे घेतले जाऊ शकतील, अशी सूचना यावेळी त्यांनी केली. विभागीय क्रीडा संकुलात मुख्य पिण्याच्या पाण्याच्या टाकीची क्षमता ही दीडलाख लिटर असून, २० हजारांच्या प्रत्येकी २ टाक्या आहेत. या पाण्याचे आॅडिट करून त्याचा योग्य वापर व्हायला हवा. आरोग्यासाठी अ‍ॅथेटिक्स मैदानावर धावण्याचा सराव करणाºया खेळाडू आणि नागरिकांना त्रास होत आहे. हे लक्षात घेऊन पिण्यास अयोग्य पाण्याचे टँकर आठवड्यातून एकदा बोलावण्यात यावे, असे त्यांनी क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांना बजावले.
विभागीय क्रीडा संकुलाच्या नाल्यांमधील मातीचीही विल्हेवाट पावसाळा झाल्यानंतरही करण्यात आलेली नाही. ही माती अ‍ॅथलेटिक्स मैदानावरील अर्दंड माऊंटवर टाकावी ज्यायोगे नागिरक तेथे फिटनेस करू शकतील व स्वच्छताही राखली जाईल. टेनिस केंद्राच्या मागे कचरा आहे त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक करावा ज्यायोगे तेथे स्वच्छता राखली जाईल, असे त्यांनी सांगितले. हॉकी मैदानावर क्रिकेट खेळले जात आहे. त्यामुळे हॉकीपटूंसाठी हॉकीचे मैदान पूर्णपणे खुले करून क्रिकेट या खेळासाठी दुसºया ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी सुचवले.

Web Title: Dangers about uncleanness in the departmental sports complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.