शहराला फक्त नालेच बुडविणार...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:56 AM2018-06-04T00:56:18+5:302018-06-04T00:56:34+5:30

हरात अतिवृष्टी अथवा मुसळधार पाऊस झाल्यास अनेक सखल भागात राहणाऱ्या नागरिकांची संपूर्ण घरे पाण्याखाली येणार हे निश्चित. कारण शहरातील सर्व मोठे नाले गाळ, केरकचरा आणि अतिक्रमणांनी व्यापले आहेत.

The city will only dump due to gatars | शहराला फक्त नालेच बुडविणार...!

शहराला फक्त नालेच बुडविणार...!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात अतिवृष्टी अथवा मुसळधार पाऊस झाल्यास अनेक सखल भागात राहणाऱ्या नागरिकांची संपूर्ण घरे पाण्याखाली येणार हे निश्चित. कारण शहरातील सर्व मोठे नाले गाळ, केरकचरा आणि अतिक्रमणांनी व्यापले आहेत. हे चित्र आपली महापालिका उघड्या डोळ्याने बघत असली तरी ठोस उपाययोजना करायला तयार नाही. उलट १ कोटी ७० लाख रुपये खर्च करून नालेसफाईचे निव्वळ नाट्य रंगविण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी शहरात झालेल्या थोड्याशा पावसानेच महापालिकेचे पितळ उघडे पडले. अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे.
रविवारी सकाळी महापालिका पदाधिकारी व आयुक्तांतर्फे शहरातील नाल्याच्या पाहणीचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयुक्तांनी ऐनवेळी या मोहिमेतून अंग काढून घेतले. महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेता विकास जैन यांच्यासह अधिकाºयांचा फौजफाटा महापौर बंगल्यावरून नालेसफाईची पाहणी करण्यास निघाला. पदाधिकारी येणार असल्याने अगोदरच महापालिकेची यंत्रणा ठिकठिकाणी अलर्ट होती. नालेसफाईची पाहणी करण्यासाठी दरवर्षीचे काही स्पॉट ठरलेले आहेत. याला राजकीय भाषेत पिकनिक स्पॉटही म्हणतात.
रविवारी सकाळी पदाधिकारी व अधिकाºयांचा ताफा पदमपुरा भागातील दिवेकर आॅटोसमोरील नाल्याजवळ पोहोचला. येथील अरुंद नाला मागील १२ ते १३ वर्षांपासून उघडलाच नव्हता. या नाल्यावरील एका ढाप्याचे वजन १ टनापेक्षा जास्त आहे. क्रेन लावून ढापे काढण्यात आले. नाला गाळाने पूर्णपणे चोकअप झाला होता. कंत्राटदाराने अत्यंत मन लावून नाल्याची सफाई केल्याचे दिसून येत होते.
येथून पाहणी दौरा थेट महापालिका मुख्यालजवळील नूर कॉलनीत पोहोचला. तेथील परिस्थिती अत्यंत विदारक होती. मनपाने नाल्यातच पाईप टाकले आहेत. त्यामुळे आसपासच्या घरांमध्ये दरवर्षीच पाणी साचते. पाईप काढून नाल्याशेजारी राहणाºयांना अलर्टची नोटीस देण्याचे आदेश महापौरांनी दिले. नारळीबाग भागात माणसे लावून नाला साफ करण्याचे आदेश दिले. येथे एका पोकलेनच्या साह्याने नाल्यातील गाळ काढून काठावरच टाकण्यात येत होता. मोठा पाऊस आल्यास गाळ आपोआप वाहून जातो. १ कोटी ७० लाख रुपयांचे
काम घेणारा कंत्राटदार परत नालेसफाईचा दावा करायला ‘मोकळा’ होतो.
किलेअर्क येथील नाल्याची अवस्था पाहून पदाधिकारीही क्षणभर अवाक् झाले. नाल्यात थर्माकोल, कचरा, गाळ साचल्यामुळे व अतिक्रमणांमुळे पावसाचे पाणी जाण्यास जागाच नाही. नाल्याच्या आसपास राहणा-या नागरिकांना यंदा मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. टिळकपथ भागातील औषधी भवन येथील नाल्याची अवस्था बघताना तर धडकीच भरत होती.
नाल्यात थर्माकोल, केचरकचरा एवढा होता की, पाणी पुढे कसे जाईल हा सर्वात मोठा प्रश्न होता. येथे जेसीबी, पोकलेनही जाऊ शकत नाही. औरंगाबाद केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने मनपाला नाला साफ करण्यासाठी पाच लाख रुपये दिले. या निधीत काय होणार, असा प्रश्न मनपाला पडला आहे. न्यू उस्मानपुरा, गारखेडा, जयभवानीनगर चौक या भागातील नाल्यांचीही पाहणी करण्यात आली.

Web Title: The city will only dump due to gatars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.