कचरा बिघडवणार शहराचे आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:33 AM2018-06-05T01:33:37+5:302018-06-05T01:34:02+5:30

शहरातील प्रमुख रस्त्यांवर किमान २ ते ३ हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचऱ्यापासून आता प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.

City Health to ruin the waste | कचरा बिघडवणार शहराचे आरोग्य

कचरा बिघडवणार शहराचे आरोग्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर किमान २ ते ३ हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचऱ्यापासून आता प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. रस्त्यांवरील कचरा नेमका कुठे नेऊन टाकायचा हा महापालिकेसाठी सर्वात मोठा प्रश्न आहे. हर्सूल, पडेगाव, चिकलठाणा आणि कांचनवाडी येथे कचरा टाकण्यास नागरिकांकडून प्रचंड विरोध होत आहे. मागील दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी येत असल्याने कच-यापासून रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
शहरात दररोज ३५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. ११५ वॉर्डातील फक्त ३० वॉर्डांमध्ये ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यात येत होती. आता पावसाळा सुरू झाल्यावर ही प्रक्रियाही थांबणार आहे. ३० एप्रिल रोजी महापालिकेने शहरातील संपूर्ण कचरा उचलला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शब्द दिल्यामुळे हा कचरा उचलण्यात आला होता. मागील ४० दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील कचरा महापालिकेने उचलला नाही. त्यामुळे जिकडे तिकडे कच-याचे मोठे डोंगर दिसून येत आहेत. उन्हाळ्यामुळे या कच-यातून दुर्गंधी सुटत नव्हती. शिवाय मनपाचे हुशार कर्मचारी कच-याला आग लावून मोकळे होत होते. आता ओल्या कच-याला आग लावणे अशक्य आहे. त्यामुळे कचरा जिकडे तिकडे दिसून येत आहे. दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. कचरा ओला होऊन दुर्गंधीही सुटली आहे. ज्याठिकाणी कचºयाचे ढिगार साचले आहेत, तेथील नागरिकांना दुर्गंधीचा बराच त्रास सहन करावा लागतो. मध्यवर्ती जकात नाका येथे मनपाने बराच कचरा आणून टाकला आहे. या भागात राहणाºया नागरिकांना ऐन रमजान महिन्यात नरकयातना सहन कराव्यात लागत आहेत. या कचºयावर कोणतीही प्रक्रिया करण्यात येत नाही. हर्सूल, पडेगाव, चिकलठाणा आणि कांचनवाडी येथे कचरा टाकण्यास विरोध करण्यात येतो. शहरातील कचरा उचलून कुठे ठेवावा हा सर्वात मोठा प्रश्न प्रशासनाला आहे.
निविदा लालफितीत
शहरातील ९ झोनमध्ये कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन खरेदीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ३ कोटी रुपयांची ही यंत्रणा आहे. मागील १५ दिवसांपासून महापालिका या निविदाच उघडण्यास तयार नाही.

Web Title: City Health to ruin the waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.