बैलगाडीला देवगिरी एक्सप्रेसची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:10 AM2017-11-16T00:10:45+5:302017-11-16T00:11:21+5:30

रेल्वे रुळावर अडकलेल्या बैलागाडीला सिकंदराबादहून मुंबईकडे जाणाºया देवगिरी एक्स्प्रेसने धडक दिली. बैलगाडीत लोखंडी पोल असल्याने रेल्वे गाडी घसरण्याचा धोका होता. मात्र रेल्वे चालकाने प्रसंगावधान राखत वेग कमी केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

BAGALGADI DAGPURI DIVISION | बैलगाडीला देवगिरी एक्सप्रेसची धडक

बैलगाडीला देवगिरी एक्सप्रेसची धडक

googlenewsNext

पारडगाव : रेल्वे रुळावर अडकलेल्या बैलागाडीला सिकंदराबादहून मुंबईकडे जाणाºया देवगिरी एक्स्प्रेसने धडक दिली. बैलगाडीत लोखंडी पोल असल्याने रेल्वे गाडी घसरण्याचा धोका होता. मात्र रेल्वे चालकाने प्रसंगावधान राखत वेग कमी केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
घनसावंगी तालुक्यातील पारडगाव रेल्वे स्थानकापासून तीनशे मीटर पुढे रेल्वेरूळावर बैलगाडीत लोखंडी पोल घेऊन रेल्वेरुळ ओलाडण्याचा प्रयत्न ग्रामस्थाने केला. वजन जास्त असल्याने बैलगाडी रूळात अडकली. प्रयत्न करूनही गाडी न निघाल्याने बैल सोडून पोलने भरलेली गाडी रूळावर सोडून दिली. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुंबईकडे जाणाºया देवगिरी एक्स्प्रेसने जोराची धडक देत बैलगाडी काही अंतरापर्यत फरफटत नेली. मात्र, वेगात असलेली रेल्वे रूळावरून घसरू नये म्हणून चालकाने वेग कमी करत इमरजन्सी ब्रेक लावला. रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांच्या मदतीने रेल्वेरूळावरून लोखंडी खांब असलेल्या गाडीला बाजूला करण्यात आले. त्यानंतर रेल्वे मार्गस्थ झाली. रेल्वेचे अभियंता सुरेंद्र कुमार यांच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: BAGALGADI DAGPURI DIVISION

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.