खूनप्रकरणात बबलाचा भाऊ अमजदला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:21 AM2018-06-05T01:21:53+5:302018-06-05T01:22:06+5:30

तरुणाचे अपहरण करून त्याची क्रूरपणे हत्या केल्यापासून पसार झालेल्या एका आरोपीला गुन्हे शाखेने माळीवाडा येथे रविवारी रात्री अटक केली.

Babbla's brother Amjad arrested in the murder case | खूनप्रकरणात बबलाचा भाऊ अमजदला अटक

खूनप्रकरणात बबलाचा भाऊ अमजदला अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : तरुणाचे अपहरण करून त्याची क्रूरपणे हत्या केल्यापासून पसार झालेल्या एका आरोपीला गुन्हे शाखेने माळीवाडा येथे रविवारी रात्री अटक केली. हा आरोपी कुख्यात गुन्हेगार बबलाचा भाऊ आहे.
शेख अमजद शेख असद असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. १६ मे रोजी हिलाल कॉलनी येथील शेख जब्बार या तरुणाचे अपहरण करून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह दौलताबाद घाटातील एका विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार बबला ऊर्फ शेख वाजेद शेख असद यास १ जून रोजी अटक केली. त्याने या गुन्ह्यात त्याचा भाऊ शेख अमजद आणि अन्य आरोपी होते असे पोलिसांना सांगितले. गुन्हा घडल्यापासून पळालेला अमजद माळीवाडा येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली. रविवारी रात्री आरोपीचा शोध घेतला असता तो एका घरात लपून बसल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचून पहाटे ३.१५ वाजेच्या सुमारास चोहोबाजूने घेरून शेख अमजदला पकडले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्याला बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सोनवणे, कर्मचारी सुभाष शेवाळे, शेख बाबर, सुधाकर राठोड, अशरफ सय्यद, योगेश गुप्ता, नवाब शेख, सिद्धार्थ थोरात आणि नितीन धुळे यांनी केली.

Web Title: Babbla's brother Amjad arrested in the murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक