८७ गावांतील पाणीनमुने आढळले दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:29 PM2017-11-23T23:29:59+5:302017-11-23T23:30:26+5:30

सध्या वातावरणातील बदलामुळे आधीच सगळीकडेच रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच जिल्ह्यातील ८७ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे.

87 water samples found in villages were found contaminated | ८७ गावांतील पाणीनमुने आढळले दूषित

८७ गावांतील पाणीनमुने आढळले दूषित

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सध्या वातावरणातील बदलामुळे आधीच सगळीकडेच रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच जिल्ह्यातील ८७ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे.
अनेक गावांतून पाणीनमुनेच पाठविले जात नसल्याने हा आकडा कमी झाल्याचेही दिसून येत आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतींनी शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज असते. मात्र अनेक ग्रामपंचायती पाणीनमुने प्रयोगशाळेला पाठविण्याची व ते पाठविल्यास त्याचा काय अहवाल आला हे पाण्याचीही तसदी घेत नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे नागरिकांना दूषित पाणीपुरवठ्यावरच तहान भागवावी लागते. त्याचा परिणाम म्हणून साथ उद्भवल्याशिवाय या गावातील लोक जागे होत नाहीत. तर आरोग्य यंत्रणाही केवळ असे अहवाल तयार करून संबंधित विभागाकडे सुपूर्द करण्यापलिकडे काहीच करीत नाही.
आता हिवाळ्याचे दिवस असले तरीही अधून-मधून ढगाळ वातावरण राहात आहे. काल तर काही भागात पावसानेही हजेरी लावली होती. अशा वातावरणामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना सर्दी, खोकला, ताप यासह इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे.

Web Title: 87 water samples found in villages were found contaminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.