२२०० कार्यकर्ते बनणार स्वच्छता दूत-दानवे

By Admin | Published: December 20, 2014 11:45 PM2014-12-20T23:45:35+5:302014-12-21T00:06:49+5:30

जालना : माजी पंतप्रधान तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त २५ डिसेंबर हा दिवस सुशासन दिन म्हणून पाळणार आहे.

2200 activists will become clean messenger-demon | २२०० कार्यकर्ते बनणार स्वच्छता दूत-दानवे

२२०० कार्यकर्ते बनणार स्वच्छता दूत-दानवे

googlenewsNext


जालना : माजी पंतप्रधान तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त २५ डिसेंबर हा दिवस सुशासन दिन म्हणून पाळणार आहे. पक्षाच्या वतीने जालना शहरात स्वच्छता महाअभियान राबविण्यात येणार असून या दिवशी २२०० कार्यकर्ते स्वच्छता दूत बनणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी येथील खेरूडकर मंगल कार्यालयात शनिवारी दुपारी आयोजित पक्षाच्या जिल्हा कार्यकार्यरिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते पाशा पटेल, आ. नारायण कुचे, माजी आ. अरविंद चव्हाण, जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव, किशोर अग्रवाल, बाजार समितीचे उपसभापती रामेश्वर भांदरगे, देवीदास देशमुख, शहराध्यक्ष विरेंद्र धोका, सिद्धीविनायक मुळे आदींची उपस्थिती होती.
या अभियानासाठी लागणाऱ्या साहित्याचे तसेच कार्यकर्त्यांना आणण्याची जबाबदारी सोपवून देण्यात आली. यावेळी शेषराव कळंबे, सुधाकर खरात, पदमाकर जऱ्हाड, गोविंदराव पंडित, विजयनाना परिहार, कृष्णा जिगे, नगरसेवक सतीश जाधव, नगरसेविका अरुणा जाधव, वंदना कुलकर्णी, माजी नगरसेविका कमल तुल्ले, विजयाताई बोरा, सुनील दायमा, रवींद्र देशपांडे, राजेंद्र फुलभाटी, दत्ता पाटील, संजय तौर, किरण खरात, जि.प.चे माजी सदस्य वसंत जगताप, बद्रीनाथ पठाडे, बाबासाहेब कोलते आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी काँग्रेसच्या माजी नगरसेविका विजयाताई बोरा यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी त्यांचे स्वागत केले. ४
केंद्रीय राज्यमंत्री दानवे यावेळी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयी यांचा वाढदिवस देशभरात सुशासन दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार या दिवसी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकत्यांनी जालना शहरात सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात एकत्र यावे. त्यानंतर कार्यकर्त्यांचे वेगवेगळे समूह करून प्रत्येक समुहास एक भाग स्वच्छता अभियानासाठी दिला जाईल. प्रत्येकाने तेथे स्वत: हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करावा, असेही दानवे यांनी सांगितले.

Web Title: 2200 activists will become clean messenger-demon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.