मराठवाड्यात उपजिल्हाधिकाऱ्यांची २० पदे रिक्त; नागरिकांची होतेय परवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 07:15 PM2018-11-21T19:15:49+5:302018-11-21T19:16:22+5:30

राठवाड्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांची २०, तर तहसीलदारांची १५ पदे रिक्त आहेत.

20 posts of sub-district officers are vacant in Marathwada; Citizens' faces troubles | मराठवाड्यात उपजिल्हाधिकाऱ्यांची २० पदे रिक्त; नागरिकांची होतेय परवड 

मराठवाड्यात उपजिल्हाधिकाऱ्यांची २० पदे रिक्त; नागरिकांची होतेय परवड 

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांची २०, तर तहसीलदारांची १५ पदे रिक्त आहेत. विभागात दुष्काळाचे वातावरण असताना निर्णय अधिकार असलेली पदे रिक्त असल्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांची परवड होत आहे, शिवाय कामाचा ताण वाढत असल्याच्या तक्रारीदेखील प्रशासनातील वरिष्ठांकडे येत असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘दुष्काळात तेरावा महिना’ असल्यासारखा हा प्रकार असून रिक्त पदांवर शासनाने तातडीने अधिकारी नेमावेत, अशी मागणी जोर धरत आहे. 

औरंगाबाद आयुक्तालयात तहसीलदारांची ७ पदे मंजूर आहेत, त्यातील १ रिक्त आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात ७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १ पद रिक्त आहे. जालन्यातील १२ पैकी २, परभणीतील १२ पैकी २, हिंगोलीत ७ पैकी १, नांदेडमधील २२ पैकी ३, बीडमधील १५ पैकी २, उस्मानाबादमधील १३ पैकी ३ पदे रिक्त आहेत. 

महसूल उपायुक्तही प्रभारी
महसूल उपायुक्त हे पदही प्रभारी आहे. ३० नोव्हेंबर २०१७ पासून ते पद रिक्त आहे. प्रल्हाद कचरे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर शिवानंद टाकसाळे यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला. टाकसाळे यांच्याकडे अपर आयुक्त पदाचाही पदभार आहे. दुष्काळी पार्श्वभूमीवर किमान वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे भरली जावीत, अशी अपेक्षा प्रशासनातून व्यक्त होत आहे. 

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा तपशील
ठिकाण    रिक्त पदे

आयुक्तालय    ०२
औरंगाबाद    ०२
जालना    ०१
परभणी    ००
हिंगोली    ०४
नांदेड    ०३
बीड    ०२
लातूर    ०३
उस्मानाबाद    ०३
एकूण    २०

Web Title: 20 posts of sub-district officers are vacant in Marathwada; Citizens' faces troubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.